नागपूर ः राज्यात पोल्ट्री व्यावसायिकांच्या (Poultry Industry) अडचणी सोडविण्यासाठी एका समितीचे (Poultry Commeettiiee) गठण करण्याचे प्रस्तावीत आहे. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यासंबंधीचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला.
परंतु त्यानंतर मात्र या समितीवर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी चढाओढ निर्माण झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. आता मात्र त्याला अंतीमरुप देण्याचे काम सुरु असल्याचे वृत्त असून येत्या आठवडाभरात ही समिती प्रत्यक्षात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
करारदार कंपन्यांकडून वाढीव वजन असलेल्या पक्ष्यांची विक्री बाजारात होते. कमी पशुखाद्यात पक्षांचे वजन वाढत असले तरी वय वाढलेल्या या पक्ष्यांचे मांस खाण्यासाठी चविष्ट राहत नाही.
परिणामी खवय्यांना अपेक्षीत चव मिळत नसल्याने ते ब्रॉयलर कोंबड्यांच्या मांसापासून दूर जातात. परिणामी मागणी घटल्याने दरही गडगडतात अशी स्थिती अनेकदा निर्माण होते. अंडी बाजारपेठ देखील कंपन्यांनीच ताब्यात घेतली आहे.
सोबतच हैदराबादवरुन आवक वाढविण्याची धमकी देत दर पाडले जातात. अशाप्रकारे अनेक अडचणीचा सामना लेअर आणि ब्रॉयलर पोल्ट्री व्यावसायिकांना करावा लागतो. यातूनच नैराश्य वाढल्याने राज्यात नोव्हेंबर २०२२ पूर्वी तीन पोल्ट्री व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या होत्या.
त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्या व व्यावसायिकांची या विषयावर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी अमरावती जिल्हा पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या सदस्यांकडून करण्यात आली होती. शुभम महल्ले, अतुल पेरसपूरे यांनी त्या संदर्भात पाठपुरावा केला होता.
निवडीची प्रक्रिया अंतिम करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.