Animal Care
Animal Care Agrowon

Animal Disease : राधानगरी, कागलमध्ये ‘घटसर्प’मुळे अकरा जनावरे दगावली

Animal Care : जिल्ह्यातील राधानगरी व कागल तालुक्यांतील कांही गावांमध्ये ‘घटसर्प’मुळे अकरा जनावरांचा मृत्यू झाला.
Published on

Kolhapur News : जिल्ह्यातील राधानगरी व कागल तालुक्यांतील कांही गावांमध्ये ‘घटसर्प’मुळे अकरा जनावरांचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभागाने उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू केली आहे.

या तालुक्यांतील काही गावांतील म्हशींमध्ये अज्ञात रोगाची लक्षणे आढळून येत होती. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी लक्षणानुसार उपचार करत होते. परंतु अज्ञात रोगाने म्हशींचा कमी कालावधीत मृत्यू होत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान ११ जनावरांचा मृत्यू झाला.

या रोग प्रादुर्भावाबाबत राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांना माहिती मिळताच त्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे येथील सहआयुक्त डॉ. सुनील लहाने व पुणे विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्या पथकाला घटनास्थळी पाठवून रोग प्रादुर्भावाची तपासणी करण्याबाबत सूचित केले.

Animal Care
Animal Care : शिफारशीत वेळेत जंतनिर्मूलन आवश्यक

या पथकाने त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पशुपालकांना आजाराबाबत तसेच रोग प्रदुर्भावादरम्यान घ्यावयाची काळजी, प्रतिबंधक लसीकरण, गोठा स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आजारी जनावरांचे विविध रोग नमुने तसेच मृत जनावरांचे रोग नमुने गोळा करून राज्याच्या रोग अन्वेषण प्रयोगशाळेत अत्याधुनिक संयंत्रांच्या मदतीने रोगाचे निदान केले.

Animal Care
Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

तपासणी अंती आजारी व मृत जनावरांमधील आजार हा घटसर्प असल्याचे खात्रीशीर निदान झाले. निदानासाठी केंद्र सरकारकडील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. घटसर्प हा पशुधनास जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. सर्व प्रकारच्या पशुधनात हा आजार दिसून येत असला तरी म्हैस वर्गाचे पशुधन या रोगास जास्त बळी पडतात.

जिवाणूंचा संसर्ग बाधित चारा-पाणी व बाधित पशुधनाच्या संपर्कामुळे होतो. या आजाराचा संसर्ग झाल्यापासून तीन ते पाच दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात. आजाराची लक्षणे दिसू लागल्यापासून २४ तासांत बाधित पशुधन दगावू शकते. वेळेत उपचार केल्यास पशुधन बरे होऊ शकते. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश शेजाळ यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com