Poultry Farming : ‘परसबागेतील कुक्कुटपालन’व्यवसायाद्वारे करा अंडी उत्पादन

आजकाल प्रत्येकजण आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी काहीना काही व्यवसाय करण्याच्या विचारात असतो. कृषीपूरक व्यवसायांमध्ये परसबागेतील कुक्कुटपालन हा सोयीस्कर आणि तुलनेने सोपा व्यवसाय आहे.
Backyard Poultry Rearing
Backyard Poultry Rearing
Published on
Updated on

पुणे ः आजकाल प्रत्येकजण आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी काहीना काही व्यवसाय करण्याच्या विचारात असतो. कृषीपूरक व्यवसायांमध्ये परसबागेतील कुक्कुटपालन (Backyard Poultry) हा सोयीस्कर आणि तुलनेने सोपा व्यवसाय आहे.

Backyard Poultry Rearing
Poultry : पोल्ट्रीची जाळी तोडून २०० कोंबड्या केल्या फस्त

या व्यवसायाबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी दोन दिवसीय विशेष कार्यशाळा ता. २४ व २५ डिसेंबर रोजी एसआयआयएलसीतर्फे आयोजिली आहे.

Backyard Poultry Rearing
Poultry : पोल्ट्री व्यवसायावर मंदीचे सावट

यात परसबागेतील कुक्कुटपालन व्यवसायाचे महत्व, विकसित पक्ष्यांच्या विविध जाती, उपजाती (वनराज, गिरीराज, ग्रामप्रिया, स्त्रीनिधी, कृषि-ब्रो, ग्रामस्त्री, सुवर्णधारा, कावेरी, कडकनाथ इ.) पक्ष्यांचे व्यवस्थापन-ऊब, पाणी औषध व लसीकरण व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, पक्ष्यांचा निवारा-शेडचे व्यवस्थापन, व्यवसायाचे अर्थशास्त्र- भांडवली गुंतवणूक, नफा तोटयाचे गणित, व्यवसायाचा प्रकल्प आराखडा, चिकण व अंड्यांचे विक्री व्यवस्थापन,

पदार्थांचे मुल्यवर्धन, मार्केटींग-बाजारपेठ, पोल्ट्री यशस्वी करण्याची सूत्रे, बॅंकेला प्रकल्प सादरीकरणाची कागदपत्रे, वित्तसहाय्य, व्यवसायासाठी शासकीय अनुदान इ.विषयी मार्गदर्शन तसेच पोल्ट्री फार्मला शिवारफेरीचे आयोजन आहे. जेवण, चहा, प्रमाणपत्र आणि शिवारफेरीसह प्रतिव्यक्ती ४००० रुपये शुल्क आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१, कार्यशाळेचे ठिकाणः सकाळनगर, गेट नं.१, बाणेर रोड, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com