Climate Change : हवामान बदलाचा जनावरांवर परिणाम

Article by Dr. Vikas Khapre : उच्च तापमान, आर्द्रता आणि वाऱ्यामुळे उन्हाळ्यातील ताण जनावरांच्या शरीराच्या सामान्य शरीरविज्ञान आणि चयापचय प्रक्रियेत बदल घडवून आणतो.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

डॉ. विकास खापरे

Effects of Climate Change on Animals : उच्च तापमान, आर्द्रता आणि वाऱ्यामुळे उन्हाळ्यातील ताण जनावरांच्या शरीराच्या सामान्य शरीरविज्ञान आणि चयापचय प्रक्रियेत बदल घडवून आणतो. उन्हाळ्याच्या ताणामुळे उत्पादन, पुनरुत्पादन आरोग्यावर विविध प्रकारे परिणाम होतो. जास्त उष्णचेच्या ताणामुळे शरीराचे तापमान वाढते,

त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो परिणामी खाद्य कमी खातात आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. याचा उत्पादनावर परिणाम होतो. उन्हाळ्यात स्तनदाहाचा प्रादुर्भाव आणि सोमेटिक पेशींची संख्या वाढते. फॉलिकल्स आणि माजाच्या प्रक्रियावर सुद्धा परिणाम होतो, ज्यामुळे प्रजननक्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. वीर्य गुणवत्ता, बीजांड व गर्भधारणेचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

Animal Husbandry
Animal Care : जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनावर लक्ष द्या

जनावरांचा गोठा स्वच्छ नसल्यास पावसाळ्यात अमोनिया सारख्या रसायनाची निर्मिती होते. त्याचा परिणाम जनावरांच्या डोळ्यावर होतो, गोठ्यामधून पाण्याच्या गळतीमुळे कोक्सीडीओसीस होऊ शकतो.जमिनीवर असलेल्या ओलाव्यामुळे अनेक जीवाणु निर्माण होतात त्यामुळे जनावरे आजारी पडतात.

गोचीडासारखे बाह्य परजीवी जनावरांच्या शरीराचा चावा घेतात, त्यामुळे बबेसियोसीस, थायलेरियोसीस सारखे आजार होतात. गोठ्याच्या सभोवतालच्या वातावरणात बाह्य परजीवींची असंख्य अंडी असतात. बऱ्याचदा बाह्य परजीवींमुळे होणाऱ्या आजारांमुळे जनावरांचा मृत्यू होतो.

अस्वच्छ व्यवस्थापन व घाणेरड्या गोठयामुळे कासेचे आजार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे कासेला सूज येते, दुधात गाठी येतात, दुधातील उत्पादनावर आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.

बुरशी लागलेले खाद्य जनावरांच्या आहारात आले तर विषबाधा होऊ शकते.

गोठयाचे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे हिवाळ्यात जनावरांना थंडी वाजते परिणामी शरीरातील तापमान संतुलन राखण्यासाठी अधिक ऊर्जेचे गरज असते. उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अधिक पोषक खाद्याची गरज असते. जास्त थंडीमुळे न्युमोनिया किंवा श्वसनाचे आजार जास्त प्रमाणात होतात, त्यामुळे दूध उत्पादन, आरोग्य, पुनरुत्पादनवर परिणाम होतो.

Animal Husbandry
Animal Care : राज्यात ३० हजार जनावरांत ‘मसल प्रिंट’ तंत्रज्ञान वापरणार

जनावरांना सकस आहार मिळाला नाही तर

चयापचयाचे विकार होतात. दुग्धज्वर, कीटॉसिस,

लालमूत्र अशा आजारामुळे दूध उत्पादनावर मोठा परिणाम पडतो.

वातावरणातील तापमान कमी झाल्यास वासराला शरीरातील तापमान नियमनासाठी अधिक ऊर्जेची गरज असते. उर्जेचा जास्त वापर झाल्यामुळे वासराचे वजन आणि रोगप्रतिकरक्षमता कमी होते.

गोठ्यातील जागा ओलसर असेल तर जनावरे, वासरे आजारी पडतात. थंड हवामानात जन्मलेल्या वासरांची, करडांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते, त्यामुळे त्यांना हायपोथर्मिया होतो. यामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.

थंडीच्या काळात सकाळच्या वेळेस जनावरांचे स्नायू आखडतात, त्यामुळे जनावरे लंगडते. थंडीचा जनावरांच्या त्वचेवर परिणाम होतो. कास खडबडीत होऊन तिला भेगा पडून जखमा होऊन कासदाह होतो. परिणामी दुधउत्पादन कमी होते.

डॉ. विकास खापरे, ८४११९६४८६६

(पशुवैद्यकीय शरीरक्रियाशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई )

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com