Cow Monitor System : जनावरावर लक्ष ठेवण्यासाठी काऊ मॉनिटर सिस्टीम
अधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती आणि पशुपालनाशी संबंधित कामे अत्यंत सोपी झाली आहेत. शेती आणि पशुपालनातील बहुतांश कामं आता विविध यंत्रानी केली जातात, त्यामुळे अनेक तासांचं काम मिनिटात पूर्ण होतं.
पैशाबरोबरच मेहनत आणि वेळेचीही बचत होते. या विविध यंत्रामध्ये आता आपल्या जनावरावर २४ तास नजर ठेवणाऱ्या काऊ मॉनिटर सीस्टीम (Cow Monitor System) या डिजीटल यंत्राची भर पडली आहे. या यंत्रामुळे पशुपालकाला आता जनावरांच्या मागे धावण्याची गरज नाही.
आपलं जनावरं कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहे याशिवाय त्याच्या जनावराशी संबंधित प्रत्येक अपडेट पशुपालकाला मिळेल. त्यामुळे जनावांचे योग्य व्यवस्थापन (Animal Care Management) ठेवता येणार आहे.
काऊ मॉनिटर सिस्टीम या डीजीटल गॅझेटला इंडिन डेअरी मशिनरी कंपनीने (आयडीएमसी) मान्यता दिली आहे.
हे यंत्र बेल्ट सारखे असून जनावराच्या गळ्याभोवती घातले जाते. जेणेकरून जनावर कुठेही गेलं तरी पशुपालकाला त्याचे लोकेशन कळेल.
जनावराच्या हालचालीवरही लक्ष ठेवेल. याशिवाय जनावरांतील आजारांबद्दलही माहिती देईल. जनावरांना धोकादायक आजारांपासून कसे वाचवायचे, याबाबतही हे यंत्र माहिती देणार आहे.
काऊ मॉनिटर सिस्टीममुळे जनावराच्या गर्भधारणेशी संबंधित माहितीही मिळणार आहे.
हे यंत्र सुमारे १० किलोमीटरच्या परिघात जनावराचे स्थान ट्रॅक करेल. जनावराच्या हालचालीवरही लक्ष ठेवेल. या बेल्टमध्ये जीपीएस आहे, त्यामुळे जनावरांना कोणतीही हानी पोहोचत नाही.
जी जनावरे चरण्यासाठी गेल्यावर कुठेही जातात आणि मग मालक त्यांचा शोध घेत राहतात त्यांच्यासाठी हे यंत्र विकसीत करण्यात आले आहे.
हे यंत्र बॅटरीवर चालते. बॅटरी कमीत कमी 3 ते 5 वर्षे चालते. बाजारात या यंत्राची किंमत ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत असणार आहे.
मात्र सध्या तरी भारतीय बाजारात हे यंत्र उपलब्ध नाही. येत्या तीन ते चार महिन्यांत हे यंत्र पशुपालकांना उपलब्ध होईल,असा अंदाज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.