
रत्नागिरी : जिल्ह्यात गतवर्षी लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) झालेली जनावरे आढळली होती. यंदाही तशी शक्यता वर्तवली जात आहे. हा आजार माशा, डास, गोचीड, चिलटे, पिसवा तसेच बाधित (Lumpy Infected Animal) जनावरांचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यांच्यामार्फत होतो. या आजारांची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.
लंपी स्कीन हा विषाणूजन्य त्वचेचा आजार असून हा आजार मुख्यत्वे गाई व म्हशींमध्ये आढळतो. विदेशी वंशाच्या आणि संकरित गाईंत देशी वंशाच्या गाईंपेक्षा आजाराच्या बाधेचे प्रमाण अधिक आढळून येते. उष्ण व दमट हवामान आजाराचा प्रसार होण्यास अधिक पोषक असते. या आजारामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी आजारी जनावरे अशक्त होतात, त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. या वर्षी राजस्थानमध्ये लम्पीच्या प्रादुर्भावामध्ये मरतुकीचे प्रमाण जास्त दिसून आले.
आजाराचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने गोठ्यात कीटकनाशकांची फवारणी करावी, अशा सूचना केल्या आहेत. बाधित जनावरे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
आजाराची प्रमुख लक्षणे
लम्पी स्कीन या आजारामध्ये अंगावर १० ते २० मिमी व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप, डोळ्यांतून, नाकातून चिकट स्राव, चारा-पाणी खाणे कमी अथवा बंद होणे, दूध उत्पादन कमी व काही जनावरांत पायावर सूज येणे व लंगडणे या सारखी लक्षणे दिसून येतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.