E-Pashu App : पशुसंवर्धन विभागाकडून पशू अॅपचा प्रभावी वापर
Nashik News : नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘कॉफी विथ सीईओ’ या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विभागांतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जातो. या उपक्रमाच्या सत्रात पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत ई-पशु अॅपच्या प्रभावी वापराबाबत मित्तल यांनी माहिती घेतली.
ई-पशु अॅपच्या माध्यमातून योग्य पद्धतीने पशुधनाची माहिती संकलित करता येते. तसेच पारंपरिक नोंदीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या रजिस्टरची गरज उरत नाही. मोठ्या पशूंच्या उपचारासाठी अनेकदा अधिकाऱ्यांना क्षेत्रीय पातळीवर जावे लागते.
अशावेळी अॅपद्वारे त्वरित उपचार केलेल्या पशूंची नोंद करता येते. पशूसंबंधित वैद्यकीय माहिती सहज उपलब्ध होते. त्याचबरोबर पशूंच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधी वैद्यकीय केंद्रात उपलब्ध आहेत की नाही याची देखील पडताळणी करून त्या उपलब्ध करून दिल्या जातात.
चर्चेदरम्यान ‘मिशन कामधेनू’ या उपक्रमाबाबत देखील माहिती देण्यात आली. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट घडवून आणण्यात येत आहे. दवाखान्यांमध्ये आधुनिक उपकरणे, स्वच्छ व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या वेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशू उपचारांवेळी येणाऱ्या अनुभव या वेळी सांगितले.
क्षेत्रीय पातळीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणींची या वेळी माहिती घेतली. या कार्यक्रमात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, विविध तालुक्यांतील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद
‘कॉफी विथ सीईओ’ उपक्रमातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक संवादामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळत असून, जिल्हा परिषद प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील सुसंवाद अधिक बळकट होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.