काय आहेत जिताडा माशाची वैशिष्ट्ये?

जिताडा हा एक चविष्ट मासा आहे. हा मासा गंगा, गोदावरी, महानंदा, कृष्णा यांसारख्या नद्यांच्या खोऱ्यात आढळून येतो.
Jitada Fish Information
Jitada Fish InformationAgrowon
Published on
Updated on

जिताडा (jitada) हा एक चविष्ट मासा आहे. हा मासा गंगा, गोदावरी, महानंदा, कृष्णा यांसारख्या नद्यांच्या खोऱ्यात आढळून येतो. बंगाली भाषेत या माशाला भेक्ती या नावाने ओळखले जाते.

ज्या लोकांची शेती ही खाडीलगत (salt water) असते. अशा शेतात तळे खोदून या माशांची पैदास करण्यात येते. नैसर्गिकरित्या गोड्या पाण्यात आढळणारा हा मासा प्रजननासाठी खाडीलगतच्या पट्ट्यात किंवा समुद्रालगतच्या भागात स्थलांतर करतो.

जगभरात जिताडा संवर्धनासाठी (jitada conservation) मोठे प्रयत्न केले जातात. हा मासा पाण्यातील बदलांबरोबर स्वतःला जुळवून घेतो. या कारणामुळे त्याचे गोड्या व खाऱ्या दोन्ही पाण्यात संवर्धन करता येते.

या माशाचे शरीर लांबट असून, डोक्यावर छोटासा खड्डा असतो. कल्ल्याच्या पुढील भागात एक छोटासा काटा असतो. जिताडा मासा आपल्या आयुष्यातील सुरुवातीची २ ते ३ वर्षे ही गोड्या पाण्यात घालवतो. प्रजननक्षम नर आणि मादी प्रजननासाठी किनाऱ्यालगत स्थलांतर करतात. आणि तेथेच अंडी घालतात.

Jitada Fish Information
दूध भेसळीबाबत जागरूकता महत्त्वाची

या माशाचा रंग करडा ते हिरवा असून, पाठीवरील भाग काळसर तर पोटाकडील भाग हा चंदेरी रंगाचा असतो. प्रजजनाच्या काळात या माशाच्या शरीरावर जांभळ्या रंगाच्या छटा दिसतात. पिल्ले याच खाडीपट्ट्यात लहानाची मोठी होतात. प्रजननक्षम माशांची लांबी ४५ ते ६१ सेंटीमीटर असते. स्टॉकिंगसाठी ८ ते १० सेंटीमीटर लांबीची १० ग्रॅम वजनाचे मत्स्यबीज वापरले जाते.

Jitada Fish Information
कालवडींसाठी योग्य निवारा व्यवस्था महत्त्वाची

जिताडा हा प्राणीभक्षक मासा आहे. छोटे प्राणी, कवचधारी मासे हे जिताडाचे प्रमुख अन्न आहे. सुरुवातीच्या अवस्थेत जिताडा नराचे गुणधर्म दाखवितो. कालातंराने त्याचे मादीमध्ये रुपांतर होते.

मादीचा आकार नरापेक्षा मोठा असतो. जिताडा मासा दोन वर्षात तीन किलोपर्यंत वाढू शकतो. जीताडाचे अधिकाधिक उत्पादन हे जून ते ऑक्टोबर या कालावधीत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com