
डॉ. सचिन रहाणे, डॉ. दिनेश भोसले
कालवड संगोपनात (Calves Management) आहार आणि आरोग्य व्यवस्थापनासोबत (Calves Diet Management) निवारा व्यवस्थापनदेखील (Shelter Management) महत्त्वाचे आहे. कालवड आजारी पडणार नाही, चारा पाणी योग्य पद्धतीने पुरवता येईल आणि कालवडीवर लक्ष ठेवता येईल याप्रकारे निवारा व्यवस्था केल्यास कालवड संगोपन सोपे होते.
कालवडीसाठी पिंजरा (काल्फ केज) ः
कालवडीचे योग्य व्यस्थापन होण्याच्या दृष्टीने सुरुवातीचे २१ दिवस कालवडीला स्वतंत्र निवारा व्यवस्था (Shelter For Calves) करावी. कालवडीची स्वतंत्र निवारा व्यवस्था करण्यासाठी ‘काल्फ केज पद्धत’ अतिशय फायदेशीर ठरते. यात प्रत्येक कालवडीला स्वतंत्र पिंजरा केला जातो. पिंजऱ्यामध्ये काल्फ स्टार्टर, पाणी आणि सुका चारा वेगवेगळा देण्याची सोय केलेली असते.
पिंजऱ्याची रचना ः
कालवडीचा पिंजरा हा ११० सेंमी लांब, ७५ सेंमी रुंद आणि १०५ सेंमी उंच असावा. पिंजऱ्याच्या खालची बाजू ही जमिनीपासून ३० सेंमी उंच असावी.
पिंजऱ्यातील खालचा प्लॅटफॉर्म हा लाकडी किंवा प्लॅस्टिकच्या पट्ट्यांच्या बनविलेला असावा. या पट्ट्या आडव्या बसविलेल्या असाव्यात. दोन पट्ट्यांत १ इंच अंतर असावे. जेणेकरून कालवडीचे मूत्र त्यातून निघून जाऊन पिंजरा कोरडा राहण्यास मदत होते.
पिंजऱ्याच्या समोरील बाजूने खाद्याची ३ भांडी जोडलेली असावीत.
पिंजऱ्याच्या आतमध्ये कालवडीस इजा होईल असे टोकदार किंवा अन्य प्रकारचे कोणतेही भाग नसावेत.
दोन्ही लांबीच्या बाजूला असलेले उभे गज किंवा पट्ट्यांमध्ये १५ सेंमी अंतर ठेवावे. यापेक्षा कमी अंतर ठेवल्यास पाय अडकून कालवड पडण्याचा धोका असतो.
कालवडीला आत सोडता येईल आणि बाहेर काढता येण्यासाठी पिंजऱ्याच्या मागील बाजूस दरवाजा करावा.
पिंजऱ्यामध्ये चारा व पाणी पिण्यासाठी स्वतंत्र भांडी असावीत.
पिंजरे ठेवण्यासाठी जागेची निवड ः
पिंजरे ठेवलेली जागा हवेशीर असावी. परंतु थंड किंवा उष्ण हवेपासून कालवडीचा बचाव व्हावा.
दोन पिंजऱ्यात किमान ५० सेमी अंतर असावे.
कालवडीचे पिंजरे गायींपासून वेगळे ठेवावेत.
कालवडी एकमेकांपासून दूर असल्या तरी तिला इतर वासरे दिसावीत अशी जागा निवडावी.
पिंजरे वापरण्याची पद्धती ः
- कालवड जन्माला येण्यापूर्वी पिंजरा निर्जंतुक करून ठेवावा.
- कालवड जन्मल्यानंतर तत्काळ कोरडे करून पिंजऱ्यात स्थलांतरित करावे. जेणेकरून गाय विण्याच्या जागेतील रोगजंतूंसोबत कालवडीचा कमीत कमी संपर्क येईल.
- पिंजऱ्यात भरपूर प्रमाणात सुके गवत, भुसा किंवा पालापाचोळा टाकावा. यात कालवडीचे मूत्र शोषले जाऊन जागा कोरडी राहील.
- वेळोवेळी पिंजऱ्यात टाकलेले गवत किंवा भुसा बदलावा.
- खाद्य आणि पाण्याची भांडीसुद्धा वेळोवेळी बदलावीत. भांड्यांची नियमित स्वच्छता करावी.
- पिंजरे ठेवलेली जागा हवेशीर असावी. परंतु थंड किंवा उष्ण हवेपासून कालवडीचा बचाव व्हावा.
- दोन पिंजऱ्यात किमान ५० सेमी अंतर असावे.
- कालवडीचे पिंजरे गायींपासून वेगळे ठेवावेत.
- कालवडी एकमेकांपासून दूर असल्या तरी तिला इतर वासरे दिसावीत अशी जागा निवडावी.
पिंजरे वापरण्याची पद्धती ः
- कालवड जन्माला येण्यापूर्वी पिंजरा निर्जंतुक करून ठेवावा.
- कालवड जन्मल्यानंतर तत्काळ कोरडे करून पिंजऱ्यात स्थलांतरित करावे. जेणेकरून गाय विण्याच्या जागेतील रोगजंतूंसोबत कालवडीचा कमीत कमी संपर्क येईल.
- पिंजऱ्यात भरपूर प्रमाणात सुके गवत, भुसा किंवा पालापाचोळा टाकावा. यात कालवडीचे मूत्र शोषले जाऊन जागा कोरडी राहील.
- वेळोवेळी पिंजऱ्यात टाकलेले गवत किंवा भुसा बदलावा.
- खाद्य आणि पाण्याची भांडीसुद्धा वेळोवेळी बदलावीत. भांड्यांची नियमित स्वच्छता करावी.
पिंजरा पद्धतीच्या निवाऱ्याचे फायदे ः
- पिंजरा पद्धतीत वासरावर वैयक्तिक विशेष लक्ष ठेवता येते.
- कालवडींना सुरुवातीच्या काळात इतर कालवडी किंवा गाईंना चाटण्याची सवय असते. त्यामुळे कालवडी आजारी पडण्याची शक्यता असते. पिंजरा पद्धतींमुळे हे टाळले जाते.
- कालवड किती खुराक खाते, पाणी पिते का नाही, यावर लक्ष ठेवता येते.
- सुरुवातीच्या काळात कालवडीमध्ये अपेक्षित रोगप्रतिकारक शक्ती तयार झालेली नसते. अशावेळी इतर वयाच्या वासरांबरोबर ठेवल्यास कालवडींना विविध आजार सहज होण्याची शक्यता असते. त्यांपासून संरक्षण होते.
- नवजात वासराला इतर वासरांबरोबर ठेवल्यास ते त्याची नाळ चाटण्याची शक्यता असते. अशा वेळेस नाळ तुटणे किंवा नाळेला संसर्ग होण्याचा धोका टाळता येतो.
कालवडींसाठी स्वतंत्र कप्पे ः
वासरांची २१ दिवसांनंतर स्वतंत्र मोठ्या कप्प्यात निवारा व्यवस्था करावी.
कप्प्याचे आकारमान ः
- प्रत्येक कप्पा कमीत कमी १.५ बाय २ मीटर आकाराचा असावा.
- कप्प्यामध्ये भुस्कट किंवा वाळलेले गवत टाकून बसण्याची सोय करावी. तसेच मागच्या बाजूला निवाऱ्याची सोय करावी.
- समोरील बाजूस खाद्याची ३ भांडी ठेवावीत.
- कप्प्यांमध्ये देखील वासरांचा एकमेकांसोबत संपर्क येणार नाही अशी व्यवस्था करावी. जेणेकरून विविध रोगजंतूंचा संसर्ग टाळता येईल.
स्वतंत्र कप्प्पे वापरण्याची पद्धत (काल्फ पेन) ः
- वासरे कप्प्यात मोकळी सोडावीत. जेणेकरून वासरांना कप्प्यात आरामशीर फिरता येईल.
- खाद्य खाताना कालवडींना इतर वासरे दिसली पाहिजेत. जेणेकरून त्यांना सुद्धा खाद्य खाण्याची इच्छा होईल.
- भरपूर गवत किंवा भुसा वापरून बेडिंग करावे. जेणेकरून कप्पा कोरडा राहील आणि वासरे स्वच्छ राहतील.
- आठवड्यातून एकदा कप्पा स्वच्छ करून सुकवून घ्यावा. त्यातील गवत व भुसा बदलावा.
एकत्रित मुक्त संचार कप्पे ः
- तीन महिन्यांनंतर गाभण होईपर्यंत एकाच वयाच्या वासरांची एकत्रित मुक्त संचार पद्धतीने निवारा व्यवस्था करावी. एका कप्प्यात ४ ते ५ पेक्षा अधिक कालवडी एकत्र ठेवू नयेत.
- कालवडींना फिरण्यासाठी कप्प्यात भरपूर जागा असावी.
- दोन वेळेस चारा आणि पशुखाद्य एकत्रित करून देण्यात यावे. पाणी कायम उपलब्ध असावे.
- वेगवेगळ्या वयाची वासरे एकत्रित ठेवल्यास चारा, पाण्यासाठी मोठी वासरे आणि लहान वासरांमध्ये स्पर्धा होते. कुपोषणामुळे लहान वासरांची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. त्यासाठी एकाच वयाची वासरे एकत्रित ठेवावीत.
संपर्क ः
डॉ. सचिन रहाणे, ९९७५१७५२०५
(डॉ. रहाणे हे पशुवैद्यकीय दवाखाना, डिंगोरे, जि. पुणे येथे पशुधन विकास अधिकारी आहेत. डॉ. भोसले हे एबी व्हिस्टा कंपनीचे विभागीय विक्री संचालक (दक्षिण आशिया) आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.