Fodder Shortage : चाऱ्या अभावी जनावरे जगविण्याचे आव्हान

Fodder Scarcity : एप्रिल व मे महिन्यांत सातत्याने आलेल्या पूर्वमोसमी पावसाने केळापूर तालुक्यातील ज्वारी, मका, भुईमूग, तीळ या पिकांचे पूर्णतः नुकसान झाले.
Fodder Shortage
Fodder Shortage Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : एप्रिल व मे महिन्यांत सातत्याने आलेल्या पूर्वमोसमी पावसाने केळापूर तालुक्यातील ज्वारी, मका, भुईमूग, तीळ या पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. जनावरांचा चारा सुद्धा अवकाळी पावसाने खराब झाल्याने आता चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.

Fodder Shortage
Water Shortage : माढा तालुक्यात १५ गावांना टँकरने पुरवठा

यावर्षी पूर्वमोसमी पावसाने (Rain) ऐन रब्बी हंगामात हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. जनावरांना लागणारा चारा सुद्धा या अवकाळी पावसाने खराब झाल्याने जनावरांना आता समोर कसे जगवायचे? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात ज्वारी, मका, भुईमूग याचे पीक घेतले जाते.

Fodder Shortage
Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

पीक निघाल्यानंतर मोटार व इतर शेतीमालाचे घटक चारा म्हणून शेतकरी जनावरांसाठी साठवून ठेवतात. मात्र आधीच झालेल्या पावसाने शेतकऱ्या सोबतच जनावरांचा तोंडचा घास सुद्धा हिसकावला गेला आहे. कडबा, मका, भुईमूग या चारा पिकांचे नुकसान झाल्याने जनावरांना येणाऱ्या दिवसांत कसे जगवायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.

अजून मे महिना अर्धा शिल्लक असून जून महिन्यात पाऊस आल्यास वैरण गवत जनावरांना खाण्यायोग्य होण्यास दीड ते दोन महिन्यांचा अवधी बाकी आहे. परंतु तोवर जनावरांना जगवायचे कसे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

यावर्षी पावसाने हातचे पीक गेले. त्यातून आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असताना जनावरांच्या चाराचा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे शासनाने चारा छावणी उघडत व जनावरांची उपासमार थांबवावी.
- श्रीनिवास रेकुळवार, पशुपालक, केळापूर, यवतमाळ
झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आज पावतो पंचनामे किंवा मदत मिळाली नाही. येणाऱ्या २५ मे पर्यंत पंचनामा करून मदत जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलन केल्या जाईल.
- अमर पाटील, अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, पांढरकवडा
खरीप हंगाम चालू होण्यास अजून वीस ते पंचवीस दिवसाचा अवकाश आहे. पण साठवणी ठेवलेला चाराच हाती नसल्याने जनावरांना एक महिना काय चारावे? असा प्रश्न उभा झाला आहे.
- बबनराव ठाकरे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com