Animal Husbandry : जातिवंत नर रेडकांची पैदास, संगोपन

Animal Care : आशियायी म्हशींमध्ये मांस उत्पादनाची चांगली क्षमता आहे. कोवळ्या म्हशीच्या मांसाचा दर्जा अधिक चांगला असतो, कारण त्यांच्यामध्ये मांसपेशींचे प्रमाण जास्त असते.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रेरणा घोरपडे, डॉ. गोविंद आंधळे

Animal Health : आशियायी म्हशींमध्ये मांस उत्पादनाची चांगली क्षमता आहे. कोवळ्या म्हशीच्या मांसाचा दर्जा अधिक चांगला असतो, कारण त्यांच्यामध्ये मांसपेशींचे प्रमाण जास्त असते. चोवीस महिन्यांपेक्षा लहान असलेल्या म्हशींचे मांस सर्वोच्च दर्जाचे असते. म्हशीचे मांस अन्नपदार्थ म्हणून वापरले जाते.

म्हैस हा बोविडे कुटुंबातील प्राणी आहे. विशेषतः दक्षिण आशिया, दक्षिण अमेरिका, दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील महत्त्वाच्या पशुधनातील ही प्रजाती आहेत. भारतातून एकूण पशू उत्पादनांच्या निर्यातीत ७८.६५ टक्के पेक्षा जास्त योगदान म्हशीच्या मांसाचे आहे. भारत हा म्हशीच्या मांसाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. म्हशीच्या मांसाला चांगली मागणी असल्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

म्हशीच्या मांसातील घटक

उच्च प्रथिने प्रमाण: प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, जे स्नायूंना बळकट करते. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे.

कमी चरबी : चरबीचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.

कमी कोलेस्ट्रॉल : कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हे हृदयासाठी चांगले मानले जाते.

आवश्यक जीवनसत्त्वे : मांसात जीवनसत्त्वे जसे की बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे (बी ६, बी१२) आणि खनिजे जसे की लोह, जस्त, फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळतात. ही पोषक तत्त्वे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहेत.

सुगंध आणि चव : रेडकाच्या मांसाला विशिष्ट सुगंध आणि चव असते, जी इतर मांसांपेक्षा वेगळी आणि आकर्षक असते.

लोहाचा स्रोत : लोहाचे प्रमाण जास्त असते, जे रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करते.

Animal Care
Animal Health : जनावरांमधील खूर वाढीची समस्या

रेडकांचे वजन वाढीसाठी उपाय

मांस उत्पादनाच्या अनुषंगाने लवकर वजन वाढीसाठी दूध उत्पादनाच्या तुलनेत जो वेगळ्या प्रकारचा आहार द्यावा लागतो, त्याच्यावर भर देणे किफायतशीर व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. रेडकाची जन्मल्यापासूनच विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

जन्मजात रेडकाचे व्यवस्थापन

जन्म झाल्याबरोबर त्याच्या नाकातील आणि तोंडातील चिकट द्राव काढून टाकावा. जर श्‍वासोच्छ्वास सुरू होत नसेल तर कृत्रिमरीत्या सुरू करावा, त्यासाठी रेडकाला आडवे झोपवून छातीला दाब द्यावा आणि मोकळे सोडणे या क्रियेचा उपयोग करावा.

जन्माच्या वेळी नाळेला टिंचर आयोडीन आणि बोरिक ॲसिडची पावडर लावावी. जर नाळ लांब जोडलेली असेल, तर आयोडीन लावण्यापूर्वी ती शरीरापासून सुमारे २ इंच अंतरावर कापून टाकावी.

जन्मल्यानंतर एका तासात रेडकू स्वतःच्या पायावर उभे राहते. दूध पिण्यास तयार होते. पण रेडकू जर कमजोर असेल तर त्याला दूध पिण्यास मदत केली तर फायदेशीर ठरते. पिण्याच्या वेळी कास स्वच्छ केल्यास संसर्ग टाळता येतो.

रेडकाला पहिल्या ४८ तासांत म्हशीचा चीक मिळणे आवश्यक आहे. चिकामुळे रोग प्रतिकारशक्ती मिळते.

आहार व्यवस्थापन

जठर विकसित होण्यापूर्वीचा काळ आणि जठर विकसित झाल्यानंतरचा काळ अशा पद्धतीने आहार दोन टप्प्यांत विभागाला जातो.

जठर विकसित होण्यापूर्वीचा आहार (जन्मापासून पाहिले तीन महिने)

या तीन महिन्यांत तीन प्रकारची खाद्य पुरवली जातात. दूध/मिल्क रेप्लेसर, काल्फ स्टार्टर आणि चारा.

पहिले तीन ते पाच दिवस चीक पाजावा. पाहिले एकवीस दिवस शरीराच्या एक दशांश वजना एवढे दूध किंवा मिल्क रिप्लेसर पुरवावे. हळूहळू दुधाच्या जागी मिल्क रिप्लेसर देऊन रेडकाला जाणाऱ्या दुधाची बचत होऊ शकते. या वेळेला थोडेसे काल्फ स्टार्टर आणि चारा सुरू करावा.

बावीस ते पस्तीस दिवसांमध्ये दुधाचे प्रमाण वासराच्या वजनाच्या १/१५ वा भाग करावे. काल्फ स्टार्टर १०० ग्राम पुरवावे. खाईल तेवढा हिरवा व सुका चारा पुरवावा.

दोन महिन्यांपर्यंत दुधाचे प्रमाण कमी करत वजनाच्या १/२० पर्यंत आणावे. २५० ग्रॅम काल्फ स्टार्टर चाऱ्यासोबत द्यावे.

दोन ते तीन महिन्यांमध्ये दुधाचे प्रमाण कमी करून काल्फ स्टार्टर ५०० ग्रॅमपर्यंत वाढवावे.

काल्फ स्टार्टर देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जठराची चांगली वाढ होते. चांगल्या प्रतीच्या काल्फ स्टार्टर मध्ये कमीत कमी २३-२६ टक्के क्रूड प्रथिने आणि कमीत कमी ७५ टक्के एकूण पचनीय अन्न घटक असतात.

Animal Care
Animal Husbandry : शेतीला मिळाली पशुपालनाची जोड

जठर विकसित झाल्यापासूनचा आहार (जन्मानंतर तीन महिन्यांनंतर)

तिसऱ्या महिन्यापासून हिरवा चारा जसे की संकरित नेपियर, पॅराग्रास, मका, इत्यादी दोन किलो प्रमाणे दररोज द्यावे. याचे प्रमाण सहा महिन्यांत ५ ते १० किलोपर्यंत वाढवावे.

मेथीघास सारखा द्विदल चारा देण्याआधी ३ ते ४ तास उन्हात वाळवावा. त्याच्यामुळे पोटफुगी होण्याची शक्यता कमी करता येते.

चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या महिन्यात खुराक मिश्रण ७५० ग्रॅम, १ किलो ग्रॅम, १.५ किलो ग्रॅम प्रत्येकी रेडकास द्यावे.

जन्माच्या सहा महिन्यांनंतर

मांस उत्पादनासाठी नर रेडकाचे संगोपन एक वर्षांसाठी केले जाते. कत्तल करण्यापूर्वी त्यांचे वजन वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट असते. त्यांच्यामध्ये खाद्याचे रूपांतर चरबीत होण्याची कार्यक्षमता कमी असल्याकारणाने वाढीव खाद्य पुरवावे लागते.खाद्यात क्रूड प्रथिने आणि एकूण पचनीय अन्न घटक प्रमाण योग्य असावे लागते.

शुष्क घटक आणि एकूण पचनीय घटक आवश्यक :

शरीर वजन (किलो ग्रॅम) वजन वाढ (किलो ग्रॅम दररोज) शुष्क घटक (किलो ग्रॅम) एकूण पचनीय घटक (किलो ग्रॅम)

७० ०.४ २.७२ २.०४

१०० ०.५ ४.४९ २.७४

२०० ०.५ ७.७९ ४.३०

३०० ०.५ १०.३४ ५.६८

पाण्याचे महत्त्व

नेहमी ताजे व स्वच्छ पाणी पाजावे. वासराने एका वेळी जास्त पाणी पिऊ नये, यासाठी पाण्याचे भांडे वेगळे तसेच दुधाच्या भांड्यापासून लांब ठेवावे.

गोठ्यात पुरेशी जागा

दूध पिण्याचे बंद होईपर्यंत प्रत्येक रेडकास स्वतंत्र खणात ठेवावे. म्हणजे दूध पिताना ती एकमेकांना त्रास देणार नाहीत तसेच सांसर्गिक आजार पसरणार नाहीत.

प्रत्येक खण स्वच्छ, कोरडा ठेवावा. त्यामध्ये हवा खेळू द्यावी. मात्र वासरांच्या अंगावर थेट गार हवा येऊ देऊ नये.

करडांना झोपण्यासाठी गवताची गादी करावी. गोठा बाहेर मोकळ्यावर असल्यास त्यावर छप्पर करावे. तसेच कडक उन्हामुळे आतील हवा तापणार नाही याची काळजी घ्यावी. पाऊस आणि गार वारा अडवण्याची व्यवस्था करावी. गोठ्याची पूर्वेकडची बाजू मोकळी असल्यास सकाळचे ऊन आत येते. नंतरच्या कडक उन्हापासून संरक्षण मिळते. आपल्याकडे पाऊसदेखील फारच क्वचित पूर्वेकडून पडत असल्याने तोही प्रश्न आपोआप सुटतो.

आजार प्रतिबंध उपाययोजना

सुरुवातीपासून रेडकाची तब्येत चांगली असणे आवश्यक आहे. म्हणजे नंतर मृत्यू, आजारपण, आजाराचा प्रसार यांसारख्या समस्या उद्‍भवत नाहीत. करडांवर नियमित नजर ठेवावी, त्यांना योग्य रीतीने योग्य तेच खायला द्यावे, स्वच्छता राखावी.

पाहिले जंत निर्मूलन दहाव्या दिवशी करावे. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या अंतराने रेडकू सहा महिन्यांचे होईपर्यंत जंतनिर्मूलन करावे.

रेडकू सहा महिन्यांचे झाल्यावर जंत निर्मूलन प्रत्येकी तीन महिन्याला करावे.

जंत निर्मूलनाची वेगवेगळी जंतनाशक बदलून वापरावीत. रेडकाची जंत चाचणी करून पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच जंत निर्मूलन करावे, जेणेकरून जंतनाशकाप्रती प्रतिकार शक्ती तयार होणार नाही.

डॉ. गोविंद आंधळे,९३५९५९६६१०

पशू उत्पादन व व्यवस्थापन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय,परळ, मुंबई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com