Team Agrowon
सालमोनेल्ला गेलीनेरम या जीवाणूच्या संसर्गामुळे कोंबड्या आणि त्यांच्या पिल्लांमध्ये फाउल टायफॉईड आजार होतो.
फाउल टायफॉईड हा कोंबड्या, बदक, गिनी फाऊल, कबुतर, मोर आणि टर्की यांच्यातील जीवाणूजन्य आजार आहे. परंतु याचा जास्त प्रादुर्भाव कोंबड्यांमध्ये वयाच्या तीन ते सहा आठवड्यांत दिसून येतो. आजार नवजात पिल्लांमध्ये सुद्धा दिसून येतो.
बाधित पिल्ले निस्तेज आणि सुस्त दिसतात. त्यांचे खाणे-पिणे कमी होते.
पिल्लांमध्ये हगवण लागते. विष्ठा पाण्यासारखी पिवळ्या रंगाची आणि चिकट होते. गुदद्वाराच्या आजूबाजूला पंखांवर विष्ठा चिकटलेली दिसते.
प्रभावित कोंबड्यांना ॲनिमिया होतो.अंडी उत्पादन कमी होते.
कोंबड्यांचे वजन कमी होते. पंखे विसकटतात. पंखांची वाढ योग्यरीत्या होत नाही. तुरे आणि लोंब पिवळसर पडतात आणि सुकतात.
कोंबड्यांना जास्त तहान लागते. आजाराने ग्रासित पिल्ले एका ठिकाणी गोळा होतात. फिरणे बंद करतात. बाधित पिल्ले वेगाने श्वास घेतात. पिल्लांची वाढ खुंटते.