Backyard Poultry
Backyard PoultryAgrowon

Backyard Poultry Management : परसातील सुधारित कोंबडीपालनाचे तंत्र

Desi Poultry Farming : परसातील कोंबडीपालनासाठी स्थानिक, देशी जातीच्या कोंबड्यांची निवड करावी. गिरिराज, वनराज, कडकनाथ, कावेरी, सोनाली यांसारख्या सुधारित देशी जाती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहेत.
Published on

डॉ. संघरत्न बहिरे

Desi Chicken Farming :

परसामध्ये कोंबड्यांना मोकळे फिरण्यास सोडल्याने त्या उपलब्ध धान्य, कीटक, गवत खाऊन जगतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता नसते. कमी कोंबड्यांपासून सुरुवात करता येते. कोंबड्यांना मोकळे सोडल्यामुळे त्यांचे व्यवस्थापन सोपे होते. त्यांना विशेष निगा राखण्याची किंवा जास्त वेळ देण्याची गरज नसते.

परसात वाढलेल्या कोंबड्यांची अंडी आणि मांस पूर्णपणे नैसर्गिक असतात. यामुळे त्यांना बाजारात चांगली मागणी आणि योग्य दर मिळतो. अंडी आणि मांसातून पौष्टिक गरजा पूर्ण होतात, ज्यामुळे कुटुंबाचे पोषणमान सुधारते. ही पद्धत पर्यावरणासाठी अनुकूल आहे, कारण यात रासायनिक खते किंवा औषधांचा वापर कमी असतो.

व्यवस्थापन

कोंबड्यांना रात्री सुरक्षित राहण्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी योग्य निवारा आवश्यक आहे.हा निवारा साध्या लाकडी फळ्या किंवा बांबू वापरून बनवता येतो.

पाऊस, वारा आणि शिकारी प्राण्यांपासून (कुत्रे, मांजर, घार) संरक्षण करावे.रात्रीच्या निवाऱ्यात पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. प्रति कोंबडी किमान १ ते २ चौरस फूट जागा असावी.

देशी कोंबड्यांना पूरक आहार देणे आवश्यक आहे. यामध्ये धान्याचे कण, भाजीपाला, डाळींचे तुकडे, भात, ज्वारी, बाजरी यांचा समावेश असावा. अंडी देणाऱ्या कोंबड्यांना कॅल्शिअम आणि खनिजांची पूरक मात्रा द्यावी. स्वच्छ पाणी उपलब्ध असावे.

Backyard Poultry
Backyard Poultry : परसातील कुक्कुटपालनासाठी ग्रामप्रिया कोंबड्या उपयुक्त

आरोग्य व्यवस्थापन

राणीखेत आजाराच्या नियंत्रणासाठी कोंबड्यांना नियमित लसीकरण आवश्यक आहे.

कोंबड्यांच्या आरोग्याचे नियमित निरीक्षण करावे. आजारी कोंबड्यांना त्वरित वेगळे करून उपचार करावेत.

पिण्याच्या पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत.

पिल्लांचे संगोपन

नवीन जन्मलेल्या पिल्लांची सुरुवातीचे ४ आठवडे विशेष काळजी घ्यावी लागते.

त्यांना उबदार आणि सुरक्षित वातावरणात ठेवावे. यासाठी बल्ब किंवा ब्रूडरचा वापर करावा.

पिल्लांसाठी स्टार्टर खाद्य द्यावे.

Backyard Poultry
Backyard Poultry : परसबागेतील कुक्कुटपालनातून अर्थकारणाला गती

अंड्यांची काळजी

दिवसातून किमान दोन वेळा अंडी गोळा करावीत, जेणेकरून ती स्वच्छ राहतील आणि फुटणार नाहीत.

अंडी स्वच्छ आणि थंड जागी साठवावीत.

अपेक्षित उत्पन्न

उत्पन्नाचा अंदाज कोंबडीची जात, व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील मागणीवर अवलंबून असतो.

एका देशी कोंबडीपासून वर्षाला सुमारे ८० ते १०० अंडी मिळू शकतात. बाजारात देशी अंड्यांना चांगली मागणी आणि दर असतो.एका कोंबडीचे वजन साधारणपणे १.५ ते २.५ किलोपर्यंत वाढू शकते.

वीस कोंबड्यांच्या गटातून वर्षाला पन्नास हजारांपर्यंत उत्पन्न शक्य आहे. हे आकडे केवळ अंदाजित आहेत. योग्य व्यवस्थापन व बाजारपेठेतील संधींचा फायदा घेतल्यास उत्पन्नात वाढ शक्य आहे.

आर्थिक फायदे

अंडी, मांस विक्रीतून नियमित उत्पन्न मिळते. गुंतवणुकीचा खर्च कमी असल्याने नफ्याचे प्रमाण जास्त असते.

पौष्टिक आहाराची उपलब्धता वाढते, कुपोषणावर नियंत्रण मिळवता येते.

अतिरिक्त उत्पन्नामुळे महिलांना बचत करण्याची आणि भविष्यात इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते.

स्थानिक स्तरावर अंडी, मांसाला मागणी असते, त्यामुळे उत्पादनांची विक्री करणे सोपे होते.

कोंबड्यांची निवड

परसातील कुक्कुटपालनासाठी स्थानिक, देशी जातीच्या कोंबड्यांची निवड करावी. गिरिराज, वनराज, कडकनाथ, कावेरी, सोनाली यांसारख्या सुधारित देशी जाती परसातील कुक्कुटपालनासाठी उत्तम आहेत. या जाती अधिक अंडी देतात आणि त्यांचे वजन चांगले वाढते. सुधारित देशी जातींच्या पिल्लांची उपलब्धता आहे.

कोंबड्यांमध्ये स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची आणि आजाराचा सामना करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे त्यांना जास्त औषधोपचारांची गरज लागत नाही. कोंबड्या स्वतःच खाद्य शोधतात, जसे की कीटक, अळ्या, गवत, धान्याचे कण. त्यामुळे त्यांच्या खाद्यावरील खर्च खूप कमी होतो.

देशी कोंबड्यांमध्ये पिल्लांना सांभाळण्याची आणि वाढविण्याची नैसर्गिक क्षमता अधिक असते.

अंडी,मांसाला बाजारात चांगली मागणी असते, कारण त्यांचा स्वाद आणि पौष्टिक मूल्य अधिक असते.

- डॉ. संघरत्न बहिरे,

९४१४८८२८६९

(शास्त्रज्ञ, प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्र (आयव्हीआरआय), पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com