
नागपूर : राज्यात पशुपालकांची हानी रोखण्याच्या उद्देशाने कार्यदलाची (टास्क फोर्स) (Animal Husbandry Task Force) स्थापना करण्यात आली होती. मात्र सद्यःस्थितीत जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’सह (Lumpy Skin Disease) इतर गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. जनावरे मृत्यू (Animal Mortality Rate) होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा ‘टास्क फोर्स’ कागदावरच असल्याचा आरोप केला जात आहे.
पाळीव प्राणी, कुक्कुट पक्षी व इतर पशुधनाला दरवर्षी संसर्गजन्य साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला याचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळे राज्यात मॉन्सूनपूर्व प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. मात्र त्यानंतर देखील साथरोगाचा प्रादुर्भाव होऊन जनावरे दगावण्याचे प्रकार घडतात. अशावेळी साथरोगाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी कार्यदलाची स्थापना करण्यात आली होती. त्यात अध्यक्ष म्हणून पशुसंवर्धन आयुक्त तर सदस्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, संशोधन संचालक, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था संचालक, भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ आदींचा समावेश आहे. विभागस्तरावर प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त तर जिल्हास्तरावर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे अध्यक्ष आहेत.
कार्यदलाची जबाबदारी अशी...
प्रादुर्भावग्रस्त भागात विशेष पथक पाठवून उपाययोजना करणे
दर आठवड्याला बैठक घेणे
आजारावर उपाययोजना करून अहवाल सादर करणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.