Animal Care : जनावरांच्या सुदृढतेसाठी ‘पशुसखीं’चा सल्ला

Pashusakhi Training : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत राज्यातील ६५० ‘पशुसखीं’ना प्रशिक्षित करण्यात येत आहे.
Pashusakhi For Livestock Health
Animal Care Agrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत राज्यातील ६५० ‘पशुसखीं’ना प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्यापैकी पुण्यातील गोखलेनगर येथील राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्थेतून ३१७ महिलांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन त्या राज्यातील विविध गावांमध्ये काम करत आहे. यासोबत शेतकऱ्यांना जनावराविषयीचे मार्गदर्शन मिळत आहे.

‘पशुसखीं’ची निवड ही उमेदमधून करण्यात आली, ज्या महिला बचत गटांमध्ये काम करत आहेत. त्यातून त्यांची निवड करून पशुसखींसाठी प्रशिक्षण देऊन त्यांना ठरवून दिलेल्या कामासाठी मानधनही मिळते. पुण्यातील तीस महिलांचे सध्या शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण सुरू आहे.

राज्यात परभणी, उद‍गीर, शिरवळ, मुंबई, नागपूर आणि पुण्यात महिलांना प्रशिक्षण दिले जाते. सध्या पशुसंवर्धन विभागाचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक गावात नाही, काही गावांमध्ये मिळून एक पशुवैद्यकीय दवाखाना असतो.

Pashusakhi For Livestock Health
Animal Care : फायदेशीर पशुपालनासाठी शाश्वत जंतनियंत्रणाची गरज

आरोग्य विभागामध्ये आशा वर्करप्रमाणे ‘पशुसखी’ ही पशुसंवर्धनसाठी महत्त्वाचा घटक म्हणून पुढे येत आहेत. पुण्यातील गोखलेनगर येथील राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्थेत ‘पशुसखी’ प्रशिक्षणात सर्वांत पहिल्यांदा जनावर हाताळायचे कसे हे शिकवले जाते. त्याचबरोबर लसीकरणाबाबतचे प्रात्यक्षिकासह धडे दिले जातात.

Pashusakhi For Livestock Health
Animal Care : जनावरांवरील प्रथमोपचाराच्या सुविधा पूर्ण करा ः मित्तल

‘पशुसखी’ काय काम करतात...?

जनावरांचा गोठा कसा स्वच्छ ठेवावा.

उन्हाळ्यात चारा कमी असतो, त्यासाठी चारा स्टॅण्डचे महत्त्व पशुपालकांना सांगणे.

महिलांना शेळी पालन कसे करावे, त्याबद्दल मार्गदर्शन.

जनावरांचे विविध लसीकरण.

जनावरांना संतुलित आहार कसा द्यावा, याबद्दल पशुपालकांना मार्गदर्शन.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर पशुसखीची अंमलबजावणी करण्यात आली असून, प्रत्येक गावाला एक ‘पशुसखी’ करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे उद्दिष्ट वाढवून आले तर जिल्हा पातळीवर प्रशिक्षण घेतले जाणार आहेत. आम्ही केवळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आलो आहोत, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त पहिल्यांदाच प्रशिक्षण घेण्यात आले आहेत.
- डॉ. सुनील पसरटे, प्राचार्य, राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था तथा पशुसखी समन्वय अधिकारी.
पुण्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर गावात येऊन जनावरांची वेगवेगळी लसीकरण मी पूर्ण केली. माझ्याकडे अकरा गावे आहेत. माझे गाव मला ओळखतच होते, पण आता बाजूची गावे पण मला ओळखत आहेत. जनावरांच्या ऑनलाइन नोंदी, पशुगणनेचेही काम करत आहे. कुणी ‘डॉक्टर’ म्हणून हाक मारली तर भारी वाटते. मी फक्त लसीकरणच करत नाही तर, जनावरांना काय चारा दिला पाहिजे, त्यांच्या सुदृढतेसाठी पशुपालकांच्या गोठ्यावर जाऊन सल्ला दिला जातो.
- हुमेरा शेख, पशुसखी, मोमीन आखाडा, ता. राहुरी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com