Lumpy Skin : नगर जिल्ह्यात तीन महिन्यांत ‘लम्पी’ने चार हजार जनावरे बाधित

Latest Update Lumpy Skin : दररोज सुमारे साठ ते सत्तर जनावरे लम्पीने बाधित होत आहेत. आत्तापर्यंत चौदा लाख चार हजार जनावरांचे लसीकरण केले आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांच्या संख्येत वरचेवर वाढ होत आहे. तीन महिन्यांत ५६७ गावांत सुमारे ४००० जनावरे या आजाराने बाधित झाली असून त्यातील २३७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दररोज सुमारे साठ ते सत्तर जनावरे लम्पीने बाधित होत आहेत. आत्तापर्यंत चौदा लाख चार हजार जनावरांचे लसीकरण केले आहे.

विशेष म्हणजे लसीकरण केल्यानंतरही बाधित जनावरांची संख्या कमी होताना दिसत नाही. यंदा गतवर्षीपेक्षाही अधिक जनावरे वेगाने बाधित होत आहेत. नगर जिल्ह्यात गाय वर्गातील सुमारे १४ लाख जनावरे आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून लम्पी स्कीनच्या आजाराने पशुपालक त्रस्त आहेत. मध्यंतरीच्या काळात कमी झालेली लम्पी स्कीनची बाधा पुन्हा तीन महिन्यांपासून सुरू झाली आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : लम्पीबाबत प्रशासनाची कागदोपत्री खबरदारी

लम्पी स्कीनची बाधा सुरू होताच यंदा पशुसंवर्धन विभागाने वेगाने लसीकरण करण्याला सुरवात केली. यंदा आत्तापर्यंत सुमारे १४ लाख ४ हजार जनावरांचे लसीकरण केले. लसीकरण करूनही आता महिन्याचा कालावधी उलटला असला तरी लम्पी स्कीनने बाधित जनावरे होण्याची संख्या कमी होताना दिसत नाही. नगर जिल्ह्यात दररोज साधारण साठ ते सत्तर जनावरे लम्पीने बाधित होत आहे. त्यात अधिक बाधित होण्याचे प्रमाण श्रीगोंदा तालुक्यात आहे.

जनावरे बाधित होण्याचे प्रमाण इतर तालुक्याच्या तुलनेत पाथर्डी तालुक्यात कमी आहे, तर संगमनेरला बाधित व मरतुकीचे प्रमाण अल्प आहे. आत्तापर्यंत तीन महिन्यांत २३७ जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला असून त्यात अकोले तालुक्यात दोन, जामखेड, कर्जत तालुक्यात चार, कोपरगावात २९, नगर तालुक्यात ११, नेवासा तालुक्यात २६, पारनेरला ६, पाथर्डीत ३२, राहात्यात ११, राहुरीत ४०, संगमनेरमध्ये एक, शेवगाव ३५, श्रीगोंदा तालुक्यात २९, श्रीरामपूर तालुक्यात ३३ जनावरे आहेत.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी’मुळे जिल्ह्यात ९५ पशुधनाचा मृत्यू

नगर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ४ हजार जनावरे बाधित झालेली असून तीन हजार जनावरे बरी झालेली आहेत. सध्या पावणे आठशे जनावरांवर उपचार सुरू असून त्यातील ३६ जनावरांची स्थिती गंभीर आहे. लम्पी स्कीनची बाधा वाढत असल्याने पशुपालक, शेतकरी त्रस्त झाले आहे. दूध व्यवसायालाही याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे

बाधित व कंसात उपाचाराने बरे झालेली जनावरे

अकोले ः ४९ (३६), जामखेड ः ७३ (४९), कर्जत ः ८६ (४७), कोपरगाव ः ३७० (३१२), नगर ः १३२ (६२) नेवासा ः ४६७ (३७९), पारनेर ः ६९ (४१), पाथर्डी ः ४८२ (३५४), राहाता ः १३० (८९), राहुरी ः ५६० (४२३), संगमनेर ः १९ (८), शेवगाव ः ९५२ (७६४), श्रीगोंदा ः ५१४ (३७९), श्रीरामपूर ः ९० (५०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com