Poultry : ‘कुक्कुटपालन’साठी मिळणार २२७८ शेतकऱ्यांना अनुदान

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन केले जावे, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून १ हजार कुक्कुटपालन मांसल पक्षाचे संगोपन करण्याची नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे.
Poultry Feed
Poultry FeedAgrowon
Published on
Updated on

नगर ः शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन (Goat Rearing) केले जावे, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून (Department Of Animal Husbandry) १ हजार कुक्कुटपालन (Poultry) मांसल पक्षाचे संगोपन करण्याची नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. त्यातून यंदा राज्यातील २ हजार २७८ लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. यावर अनुदानापोटी ३३ कोटी ४३ लाखाचे अनुदान दिले आहे. (Subsidy For Poultry Farming)

Poultry Feed
Poultry : कोंबड्यांसाठी पोषक खाद्याचे नियोजन

जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्याला ७५ टक्के अनुदान दिले जाते. अनुदान देण्यासाठी यंदा मागील वर्षापेक्षा अधिक तरतूद केली आहे. मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदा लाभार्थी संख्या अधिक आहे.

या योजनेतून अनुदान मिळावे, या साठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षी लाखभर शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. गेल्यावर्षीपासून ऑनलाइन अर्ज करण्याला सुरुवात झाली. तोच अर्ज पाच वर्षे चालेल. योजनेतून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना १ लाख १२ हजार ५००, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना १ लाख ६८ हजार ७५० रुपये अनुदान दिले जात आहे. सोडत पद्धतीने लाभार्थी निवडले जातात.

Poultry Feed
Poultry : कृषिपूरक व्यवसायातून सावरले घर!

मर्यादा वाढविण्याची गरज

ही कुक्कुटपालन योजना अन्य विभागामार्फतही राबवली जात होती. त्यात पक्ष्यांची संख्या आणि अनुदान अधिक होते. आता ते कमी केले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता मर्यादा, तसेच लाभार्थी वाढावेत म्हणून अनुदान वाढवण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

जिल्हानिहाय लाभार्थी (कंसात अनुदान)

ठाणे ः २८ (३८ लाख २७ हजार), पालघर ः २५ (२९ लाख ७७ हजार), रायगड ः ३६ (४७ लाख १३ हजार), रत्नागिरी ः ३० (३९ लाख ९१ हजार), सिंधुदुर्ग ः ३० (२७ लाख २८ हजार), पुणे ः १२० (१ कोटी ८२ लाख ८० हजार), सातारा ः ८१ (१ कोटी१६ लाख ९६ हजार), सांगली ः ७७ (१ कोटी १३ लाख ४ हजार), सोलापुर ः ११२ (१ कोटी ८५ लाख ९७ हजार), कोल्हापुर ः १०४ (१ कोटी ५४ लाख १६ हजार), नाशिक ः ९४ (१ कोटी २९ लाख ३३ हजार), धुळे ः ३६ (४९ लाख ७३ हजार), नंदुरबार ः २६ (३१ लाख ८३ हजार), जळगाव ः ९२ (१ कोटी ३० लाख ९२), नगर ः १३४ (१ कोटी ९७ लाख ६०), अमरावती ः ९१ (१ कोटी ३८ लाख २७ हजार), बुलडाणा ः १०२ (१ कोटी ५६ लाख ६७ हजार), यवतमाळ ः ७७ (१ कोटी १३ लाख ४७ हजार), अकोला ः ६३ (९७ लाख १० हजार), वाशीम ः ५१ (७८ लाख ६० हजार), नागपूर ः ६६ (९७ लाख १५ हजार), भंडारा ः ४३ (६४ लाख १९ हजार), वर्धा ः ३४ (५० लाख १४ हजार), गोंदिया ः ३७ (६० लाख १५ हजार), चंद्रपूर ः ५६ (८० लाख १ हजार), गडचिरोली ः ३३ (४३ लाख ३५ हजार), औरंगाबाद ः ७६ (१ कोटी १० लाख ९१ हजार), जालना ः ६५ (९६ लाख ४५ हजार), परभणी ः ५० (७६ लाख ५६ हजार), बीड ः ८२ (१ कोटी २० लाख ८२ हजार), लातुर ः ९४ (१ कोटी ४५ लाख ३० हजार), उस्मानाबाद ः ६१ (९१ लाख ६० हजार), नांदेड ः १२३ (१ कोटी ८७ लाख ६२ हजार), हिंगोली ः ६६ लाख ८२ हजार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com