Livestock Census : दोन महिन्यानंतरही पशुगणना गुलदस्त्यात

Animal Husbandry : दर पाच वर्षानंतर पशुगणना केल्या जाते. २० वी पशुगणना २०१९ मध्ये पार पडली होती. त्यावेळी गायवर्गीय जनावरे १३ लाख ९० हजार, तर म्हैसवर्गीय जनावरे ५ लाख ६०, असे मिळून १९ लाख ५० हजार पशूंची नोंद घेण्यात आली होती.
Livestock Census
Livestock Census Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : पशुसंवर्धन विभागाने ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २१ वी पशुगणना केली. आता पशुगणना आटोपून दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्यापही शासनाकडे २१ व्या पशुगणनेची माहिती ‘अपडेट‘ करण्यात आली नाही. यावरून शासन आणि प्रशासन किती तत्पर आहे, हे स्पष्ट दिसून येते.

दर पाच वर्षानंतर पशुगणना केल्या जाते. २० वी पशुगणना २०१९ मध्ये पार पडली होती. त्यावेळी गायवर्गीय जनावरे १३ लाख ९० हजार, तर म्हैसवर्गीय जनावरे ५ लाख ६०, असे मिळून १९ लाख ५० हजार पशूंची नोंद घेण्यात आली होती. त्यात म्हैस, गाय, बैल, मेंढ्या, शेळ्या, डुकरे आदी जनावरांचा समावेश होता.

Livestock Census
Livestock Census : सांगलीतील ८४७ गावांत ९१ टक्के पशुगणना ; अजून ६२ गावे राहिली

आता पाच वर्ष लोटल्यानंतर शासनाने २१ व्या पशूगणनेची घोषणा केली होती. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या पाच महिन्याच्या कालावधीत पशुगणना केली. याकरिता मोठ्या संख्येने पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन पशुगणना केली. आता साधारणतः पशुगणना आटोपून दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे.

Livestock Census
21st Livestock Census: राज्यात २१ वी पशुगणना पूर्ण, माहिती लवकरच होणार जाहीर

तरीसुद्धा शासनाच्या संकेतस्थळावर ‘अपडेट‘ माहिती अपलोड करण्यात आली नाही. त्यामुळे आताही शासनाच्या योजना असो अथवा पशुवैद्यकीय रुग्णालयातील औषध खरेदी २० व्या पशुगणनेच्या आकडेवारीनुसारच होत आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही.

पशुपालकांना रुग्णालयात येतात अडचणी

जिल्ह्यातील श्रेणी एक आणि श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाला औषधांचा पुरवठा केल्या जाते. बऱ्याच वेळा रुग्णालयात आवश्यकतेनुसार औषधी मिळत नाही. परिणामी, रुग्णांना खासगी दुकानातून औषधी घेण्याची वेळ येते. जनावरांना लस मोफत देण्यात येतात. परंतु औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. पशुपालकांना औषधी खरेदी करताना आर्थिक फटका सहन करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार औषधांची खरेदी करावी, अशी मागणी पशुपालकांकडून केल्या जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com