Veterinary Clinic : पशुवैद्यकीय १५ दवाखाने ‘आयएसओ’ प्रमाणित

गोंदिया जिल्ह्यात शेतीवर अवलंबिता असलेल्या या जिल्ह्यात आजही पशुधनावर आधारित शेती होते. त्यामुळेच पशुसंवर्धन विभागाच्या पशुचिकित्सालयाचे महत्त्व कायम आहे.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

गोंदिया ः यांत्रिकीकरणामुळे पशुधनाची (livestock) संख्या घटली असतानाच जे फार पशुधन शिल्लक आहे. त्यांना दर्जेदार सेवा मिळावी याकरिता जिल्ह्यात प्रयत्न होत आहे.

त्याच प्रयत्नातून १५ पशुवैद्यकीय दवाखान्यांना (Veterinary Clinic) आयएसओ (ISO) दर्जा मिळाला आहे. त्यानंतरही ५३ दवाखान्यांतील पशुवैद्यक मात्र याबाबतीत उदासीन असल्याचे वास्तव समोर आले आहे.

गोंदिया जिल्ह्यात (Gondiya District) शेतीवर अवलंबिता असलेल्या या जिल्ह्यात आजही पशुधनावर आधारित शेती होते. त्यामुळेच पशुसंवर्धन विभागाच्या पशुचिकित्सालयाचे महत्त्व कायम आहे.

मात्र गेल्या काही वर्षात या पशुचिकित्सालयाच्या दुरुस्तीकडे लक्ष्य देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक चिकित्सालयाची अवस्था बिकट झाली आहे.

जिल्हा परिषदेत गेल्या वर्षभरापूर्वी रुजू झालेले पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कांतिलाल पटेल यांनी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्थिती सुधारावी यासाठी पुढाकार घेतला.

त्यांनी सर्व पशुवैद्यकांना मार्गदर्शन करून आपापल्या दवाखान्यातील सेवा, सुविधांमध्ये सुधारणांचे निर्देश दिले. त्याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यातील जवळपास १५ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ प्रमाणित झाले आहेत.

गोंदिया जिल्ह्यात श्रेणी-१ दर्जाचे ४२ तर श्रेणी-२ दर्जाचे ३० पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यातील १५ दवाखाने आयएसओ प्रमाणित झाले आहेत.

श्रेणी-१ चे २७ व श्रेणी-२ चे ३० दवाखान्यांच्या बाबतीत मात्र तेथील पशुचिकित्सकांची उदासीनता असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे आयएसओ प्रमाणीकरणासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. परंतू निधी मिळत नाही.

त्यामुळे चिकित्सकांना लोकवर्गणी किंवा स्वतःचा पैसा खर्च करून हे काम करून घ्यावे लागते. परिणामी चिकित्सकांमध्ये याबाबत अनास्था असल्याची माहिती आहे.

Animal Care
Milch Cattle : विदर्भ-मराठवाड्यात देणार ११ हजार दुधाळ जनावरे

हे आहेत आयएसओ प्रमाणित दवाखाने

पांढराबोडी, कारंजा, कामठा, देवरी, आसोली, दासगाव, साखरीटोला, गोऱ्हे, विचारपूर, पुराडा, कडीकसा, कुऱ्हाडी, चोपा, चिरचाळबांध, घाटटेमनी यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com