Milch Cattle : विदर्भ-मराठवाड्यात देणार ११ हजार दुधाळ जनावरे

राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मराठवाडा- विदर्भात दूध उत्पादन अत्यल्प आहे. त्यास चालना देण्यासाठी ‘एनडीडीबी’च्या माध्यमातून मदर डेअरीचा प्रकल्प या भागात कार्यान्वित करण्यात आला.
Milch Cattle
Milch Cattle Agrowon
Published on
Updated on

नागपूर : ‘‘विदर्भ मराठवाड्यात दूध उत्पादनाला (Milk Production) प्रोत्साहन देण्याकरिता तब्बल ३०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून येत्या काळात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या (National Dairy Development Board) (एनडीडीबी) माध्यमातून ११ हजार दुधाळ जनावरांचे (Milch Cattle) वितरण करण्यात येईल,’’ अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.

Milch Cattle
Animal Care : नवजात वासराची घ्यावयाची काळजी

सावनेर तालुक्यातील नांदागोमुख येथे शुक्रवारी (ता. २०) आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, ‘‘राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मराठवाडा- विदर्भात दूध उत्पादन अत्यल्प आहे.

त्यास चालना देण्यासाठी ‘एनडीडीबी’च्या माध्यमातून मदर डेअरीचा प्रकल्प या भागात कार्यान्वित करण्यात आला. त्यातून दुधाची उत्पादकता वाढली असली तरी ती अपेक्षित नाही.

Milch Cattle
Milch Animal : दुधाळ जनावरांसाठी असावे अनुकूल वातावरण

त्यामुळे कृत्रिम रेतन, हिरव्या चाऱ्याची लागवड व इतर अनेक उपक्रम नियोजित आहेत. त्याकरिता ३०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. यातूनच मदर डेअरी अंतर्गतच्या दूध संघांना ११ हजार दुधाळ जनावरांचे वितरण केले जाईल.’’

बायोगॅस तसेच या भागासाठी विशिष्ट पशुखाद्य उपलब्धता देखील प्रस्तावित आहे. पशुपालकांना घरपोच कृत्रिम रेतनाची सुविधा दिली जाईल. यापूर्वी ‘माफसू’ला आयव्हीएफ तंत्रज्ञानासाठी दहा कोटी रुपये दिले आहेत.’’

‘‘माझी मुले दूध पावडरची निर्यात आखाती देशांना करतात. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियातून त्याकरिता मिल्क पावडर खरेदी केली जाते. १२५ कंटेनर इतकी मिल्क पावडर निर्यात होते. भारतातून मिल्क पावडर खरेदी करणे महागडी असल्याने परवडत नाही. यावर पर्याय म्हणजे आपल्या भागात दूध उत्पादनात वाढ करण्याची गरज आहे,’’ गडकरी यांनी सांगितले.

‘थायलंडमधून आणले विशिष्ट चारा वाण’

‘‘दुधाळ जनावरांना बारमाही हिरव्या चाऱ्या‍च्या उपलब्धतेचा प्रश्‍न आहे. त्यामुळे थायलंड येथून विशिष्ट चारा वाण आणले आहे. प्रायोगिक तत्त्वावर वर्धा येथील सुधीर दिवे यांच्याकडे या चारा वाणाची लागवड केली आहे. एक एकरात हे चारा वाण लागवड केल्यास वर्षभरात एक टन चारा मिळेल,’’ असेही गडकरी यांनी सांगितले.

धानाच्या स्ट्रॉपासून डांबर

‘‘दिल्ली व लगतच्या राज्यांमध्ये धान काढणीनंतर तणसाची विल्हेवाट जाळून केली जाते. त्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ होते. या समस्येचे निराकरण म्हणून धान्याच्या वेस्ट पासून डांबर तयार करण्याचा प्रकल्प जाहीर केला जाईल. ‘राइस स्ट्रॉ’पासून ७० टक्के डांबर व ३० टक्के बायोचार (ऑरगॅनिक कार्बन) मिळेल. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याची घोषणा दिल्लीतून केली जाईल,’’ असे गडकरी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com