Deepak Rajmohan and Vijay Anand Agrowon
यशोगाथा

Success Story : फळांची टिकवणक्षमता वाढवणारा युवकांचा ‘स्टार्ट अप’

Article by Mukund Pingle : चेन्नई येथील दीपक राजमोहन व विजय आनंद या दोन युवकांनी ग्रीनपॉड कंपनी स्थापनेच्या आधारे ‘स्टार्ट अप’ सुरू केला आहे.

मुकुंद पिंगळे

मुकुंद पिंगळे

Greenpods Lab: मूळचे चेन्नई येथील असलेले दीपक राजमोहन व विजय आनंद हे बालपणीचे मित्र आहेत. विजय यांनी ‘बीई इलेक्ट्रिकल ची पदवी घेतली आहे. तर राजमोहन यांनी कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी घेऊन ‘फूड सायन्स’ विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अमेरिकेत त्यांनी याच क्षेत्रात पाच वर्षे नोकरी देखील केली.

दरम्यान कोरोनाच्या काळात ते नोकरी सोडून भारतात परतले. कृषी क्षेत्रातील शिक्षण व अनुभव असल्याने याच विषयात स्वतःचे काही तंत्रज्ञान निर्माण करायचे असे त्यांच्या मनात होते. फळे व भाज्यांची साठवणूक व वाहतूक दरम्यान होणारी नासाडी या विषयात त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यादृष्टीने ही नासाडी कमी करून फळांची टिकवणक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘स्टार्ट अप’ च्या दृष्टीने पावले टाकली. दरम्यान मित्र दीपक पुणे येथे एका कंपनीत नोकरी करीत होते. त्यास सोबत घेऊन स्वतःची कंपनी व प्रयोगशाळा सुरू करण्याचे ठरवले.

ग्रीनपॉड कंपनीची स्थापना

दोघा मित्रांच्या संयुक्त प्रयत्नांमधून 'ग्रीनपॉड' नावाची कंपनी स्थापन झाली. कमी खर्चात तसेच वापरण्यास व हाताळण्यास सोपे, सुलभ असे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले.

नैसर्गिक घटकांचा वापर व रसायनमुक्त उत्पादन यावर मुख्य ‘फोकस’ होता. सुरवातीच्या टप्प्यात तमिळनाडू राज्याच्या विविध भागात जाऊन विविध फळपिकांचा अभ्यास केला. शेतकऱ्यांकडे भेटी देऊन काढणीपश्चात येणाऱ्या वाहतूक व टिकवणक्षमता संबंधी समस्या जाणून घेतल्या.

आज या कंपनीची चेन्नई येथे प्रयोगशाळा आहे. तेथेच उत्पादन निर्मितीच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. या प्रक्रियेतून प्रायोगिक स्वरूपात २०२० च्या दरम्यान ‘पाऊच’ स्वरूपात नैसर्गिक घटकांचा वापर असलेले उत्पादन तयार करण्यास या मित्रांना यश मिळाले.

असे आहे तंत्रज्ञान

तयार केलेल्या उत्पादनात वनस्पतीचे अर्क व पॉलिमर्स यांचा वापर केला आहे. पाऊचमध्ये ते पॅकबंद केले आहेत. हा पाऊच फळांच्या क्रेटमध्ये किंवा पॅकिंगमध्ये ठेवायचा आहे.

यामधील घटक हे रासायनिक भाषेत ‘व्होलाटाईल’ म्हणजे उड्डनशील गुणधर्माचे आहेत. ते घटक पाऊचमधून बाहेर येतात. ज्या माध्यमातून फळांची पिकण्याची गती मंदावते. तसेच हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध केला जातो.

त्यामुळे फळांची सड रोखण्यास पर्यायाने त्यांची टिकवण क्षमता वाढण्यास मदत होते. फळपीकनिहाय विशिष्ट विश्लेषणावर आधारित विशिष्ट संयुग तयार केले जाते. त्याचे प्रमाण पीकनिहाय भिन्न असते.

अवशेषमुक्त गुणधर्म

विजय म्हणाले की या उत्पादनाचे फळपिकात कोणतेही अवशेष राहात नाहीत. तशा ‘एनएबीएल’ प्रयोगशाळेत चाचण्या देखील घेतल्या आहेत. तसेच फळांची टिकवणक्षमता ३० ते ५० टक्क्याने वाढवण्याचे काम हे तंत्रज्ञान करते असे प्रयोगांमध्ये आढळले आहे.

यातील एक पेटंट देखील आम्हाला प्राप्त झाले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण प्रमाणिकरण झाले आहे.

तंत्रज्ञान प्रसार

सध्या महा राष्ट्रात नाशिक. सांगली भागात द्राक्षे, नागपूर- वरूड भागात संत्रा व सोलापूर- टेंभुर्णी भागात केळी आदी पिकांत त्याचा व्यावसायिक वापर होण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. आंबा व टोमॅटो पिकातही त्याचे प्रयोग घेण्यात येणार आहेत. सध्या भारतातील २५ ते ३० मोठ्या ग्राहकांसोबत काम सुरू आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांचे बळ या दोघा मित्रांचा हा स्टार्ट अप भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमी (हैदराबाद) येथील स्टार्ट अप इनक्युबेशन केंद्राशी संलग्न आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम- बंगळूर) यांच्याकडूनही व्यवसाय वृद्धी, विस्तार, व्यवसाय जोडणी व भांडवलासाठी मदत झाली आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अर्थसाह्य लाभले आहे. जैव तंत्रज्ञान विभागाने २५ लाखांचा निधी संशोधनासाठी दिला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'सोबत ही ‘स्टार्टअप कंपनी’ जोडली आहे. अमेरिकेतील मोन्टाना येथील 'द बायोमिमिक्री इन्स्टिट्यूट’ ने या तंत्रज्ञानाला तब्बल एक लाख डॉलरचे पारितोषिक दिले आहे.

तंत्रज्ञान वैशिष्ट्ये व फायदे

कोणत्याही कृत्रीम रासायनिक घटकांचा वापर नाही. केवळ नैसर्गिक वनस्पतींच्या अर्काचा वापर.

प्रति पाऊच किंमत चार ते सहा रुपये. कमी खर्चात काढणीपश्चात टिकवण क्षमता व गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त पर्याय.

फळाची चव,आकार व पौष्टिक गुणधर्म टिकून राहतात.

उष्ण व शीत वातावरणात वापरासाठी अनुकूल

आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे सुरक्षित अन्न उत्पादनाची हमी

रसायन अवशेषमुक्त उत्पादन

विविध फळांनुसार वापर वेगळा. त्यानुसार टिकवणक्षमतेत वाढ.

वापर:

फळपीक पाऊच संख्या

द्राक्षे १० किलो- १

केली...१३ किलो १

आंबा...४ किलो. १

संत्रा...३० किलो. १

फळनिहाय दिसून आलेले परिणाम:

द्राक्ष- देशांतर्गत बाजारपेठेत मालाची वाहतूक करताना द्राक्षांचे घड व मणी ताजे राहतात. बुरशीचा प्रादुर्भाव न होता माल व्यवस्थित पोचणे शक्य.

आंबा- काळे डाग येत नाहीत. सड होत नाही. फळ पक्वतेचा वेग कमी होतो.

केळी- केळी कडक राहतात.

संत्रा- मलूल होण्यापासून वाचते. रंग टिकून राहतो.

संपर्क:

विजय आनंद- ८९७१४२२०६६

दीपक राजमोहन- ८९२५६८५५५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT