Horticulture Agrowon
यशोगाथा

Horticulture : फळबागेतून शाश्‍वत उत्पन्नाचा ध्यास...

अंत्री देशमुख (ता.मेहकर,जि.बुलडाणा) येथील बी.के.देशमुख यांनी फळबागेतून शेती शाश्वत केली आहे. पारंपरिक पिकांच्या बरोबरीने जांभूळ,आंबा, पेरू, चिकू याचबरोबरीने तोंडली, कर्टुली लागवडीतून त्यांनी शेतीमध्ये वेगळी ओळख तयार केली. फळविक्रीसाठी त्यांनी ‘देशमुख फार्म' हा ब्रॅण्ड तयार केला आहे.

 गोपाल हागे

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत. अशांमध्ये आवर्जून एक नाव घेतले जाते, ते म्हणजे अंत्री देशमुख येथील बादशाहराव किसनराव देशमुख यांचे. सुमारे ६५ एकर शेतीचे ते व्यवस्थापन (Farm Management) करतात. १९७० च्या दशकात कृषी पदवीधर झाल्यानंतर त्यांनी नाशिक, कोकण विभागात नोकरी केली. कृषी विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्णवेळ शेतीत (Full Time Farming) झोकून दिले. आज ते संपूर्ण फळबागेचे (Orchard Management) नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन करतात.२०१० पासून त्यांनी रासायनिक खते (Chemical Fertilizer), कीडनाशकांचा (Pesticide) वापर पूर्णतः बंद केला. दर वर्षी २० एकरामध्ये सोयाबीन आणि तूर लागवड असते. इतर क्षेत्रावर विविध फळबागा आहेत. संपूर्ण शेतीला पाणी पुरवठ्यासाठी विहीर, कूपनलिकांची सोय केली आहे. दोन शेततळी देखील आहेत. त्यांची पत्नी पद्मा आणि दोन मुलांची देखील शेती नियोजनात चांगली साथ मिळाली आहे. शेतीमध्ये दररोज किमान दहा मजुरांना देशमुखांनी रोजगार दिला आहे.

जमीन सुपिकतेवर भर ः

देशमुख हे कृषी विभागात नोकरीला असल्याने राज्यभरातील शेती प्रयोग त्यांना पाहता आले. शेतीत खर्च कमी झाला तरच ती परवडते हा निष्कर्ष त्यांना पटला. जमीन सुपिकतेचे महत्त्व लक्षात घेऊन पीक व्यवस्थापन करताना ते जीवामृत, शेणखत, गोमूत्र, गांडूळ खत, घन जिवामृत, दशपर्णी अर्क, राख, तेलबियांची पेंड, शेण स्लरी, पालापाचोळ्याचे कंपोस्ट खत, वेस्ट डिकंपोझर, लेंडी खताचा पुरेपूर वापर करतात. फळबागेत पडणारा पालापाचोळा, तण जागेवरच कुजवतात. सर्व सेंद्रिय खते ते स्वतः बागेत तयार करतात. त्यामुळे आर्थिक बचत होते.

जांभूळ बागेने दिली दिशा ः

बुलडाणा जिल्ह्यात जांभळाची फारशी लागवड नाही. भविष्यातील बाजारपेठ लक्षात घेऊन १६ वर्षांपूर्वी बी. के. देशमुख यांनी चार एकरात जांभळाच्या रॉयल आंध्रा या जातीची लागवड केली. या भागात जांभळाची लागवड असणारे ते एकमेव शेतकरी आहेत. गेल्या काही वर्षात पाण्याच्या समस्येमुळे कमी अधिक प्रमाणात फळ हंगाम हाती आले. खरा पैसा मागील हंगामापासून मिळू लागल्याचे ते सांगतात. त्यांना जवळपास १०० क्विंटल जांभूळ या बागेतून मिळाले. सरासरी ८० ते १०० रुपये दराने त्यांनी विक्री केली. यंदाच्या वर्षी आतापर्यंत सहा टनांपेक्षा अधिक माल निघाला आहे. दररोज परीसरातील बाजारपेठेत जांभळाची विक्री केली जाते.

बागेची वैशिष्ट्ये ः

- रॉयल आंध्रा जातीच्या कलमांची लागवड, चविष्ट, जास्त गराचे फळ.

- लागवडीचे अंतर २० बाय २० फूट

- जानेवारी ते मार्च दरम्यान फूल धारणा.

- पहिला पाऊस झाल्यावर १५ दिवसांनी जांभूळ काढणीस येते.

- कलमांना सेंद्रिय खते, कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर.

- जानेवारीपर्यंत ताणावर असलेल्या बागेला नंतर मुक्त पद्धतीने महिन्यातून दोन वेळा पाणी व्यवस्थापन.

- फूल धारणा झाल्यावर जैविक घटकांची फवारणी.

विविध फळपिकांची लागवड ः

देशमुख यांनी टप्याटप्याने फळपिकांच्या लागवडीवर लक्ष केंद्रित केले. सध्या त्यांच्याकडे चार एकरावर आंबा (जात ः तोतापुरी, बारमासी, केसर, बदाम, इमाम पसंद) लागवड आहे. पाच एकरावर पेरू (जातः सरदार), एक हेक्टरवर चिकू (जातः कालीपत्ती, क्रिकेटबॉल) लागवड आहे. याचबरोबरीने देशमुख यांनी एक एकरावर तोंडली आणि दोन एकरात कर्टुलीच्या स्थानिक जातीची लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी दोन एकरामध्ये त्यांनी प्रयोग म्हणून सफरचंदाच्या एचआरएस-९९ या जातीची लागवड केली.

यंदा तीन एकर नवीन लागवड त्यांनी केली.

शेती बांधावर विविध वनौषधी, साग, आवळा, सीताफळ,रामफळाची लागवड आहे. आंबा, चिकू, पेरू, तोंडली आणि कर्टुलीचे उत्पादन सुरू झाले आहे. पंचक्रोशीतील बाजारपेठेत पिकलेला आंबा ६० रुपये, चिकू २५ रुपये, पेरू २० रुपये, तोंडली २० रुपये,कर्टनही १०० रुपये प्रति किलो या दराने विक्री होते.

सुबाभूळ लागवडीचा प्रयोग ः

देशमुख यांनी काही वर्षांपूर्वी दोन एकरात सुबाभूळ लावली. पेपर निर्मिती उद्योगातून असलेली मागणी पाहता येत्या वर्षात हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे नियोजन केले आहे. व्यवस्थापनाला सोपे जाण्यासाठी पारंपारिक पीक लागवड बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

ब्रॅण्ड नेम' ने फळांची विक्री ः

फळ विक्रीसाठी देशमुख यांनी ‘देशमुख फार्म' हा ब्रँड तयार केला. नैसर्गिक पद्धतीने उत्पादित फळांना ग्राहकांच्याकडून चांगली मागणी आहे. सध्या थेट ग्राहकांना जांभळाची १०० ते १२० रुपयांपर्यंत दराने विक्री होते. मेहकर, जालना, लोणार, वाशीम, रिसोड अशा ठिकाणी त्यांची फळे विक्रीस जातात. यंदा त्यांनी शेतीमाल वाहतुकीसाठी चारचाकी वाहन खरेदी केले आहे. त्याद्वारे गावोगावी जाऊन थेट ग्राहकांना फळ विक्रीवर त्यांचा भर आहे.

संपर्क ः बी.के.देशमुख, ८२०८०७३३७३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या नवीन फुलबाजाराचे काम संथ गतीने

IAS Varsha Ladda: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा लड्डा

Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीवर प्रशासक की राष्‍ट्रीय बाजार?

Pandharpur Darshan: ‘व्हीआयपी’ दर्शन बंद केल्याने, १५ तासांचे दर्शन ५ तासांवर

SCROLL FOR NEXT