Krushnadev Shinde Agrowon
यशोगाथा

Poultry Business : अडतीस वर्षांपासूनच्या पोल्ट्री उद्योगाचे साधले विस्तारीकरण

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Poultry Farming : सांगली जिल्ह्यातील विटा-खानापूर तालुका पोल्ट्री आणि वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे चाळीस-पंचेचाळीस वर्षापूर्वी परिसरात पोल्ट्री व्यवसाय सुरु झाला. अनेक संकटांमधून त्यावर मात देत येथील पोल्ट्री व्यावसायिकांनी वाटचाल सुरू ठेवली.

याच तालुक्यात अग्रणी नदीच्या काठावर बेणापूर गाव वसलं आहे. पूर्वी हा गाव परिसर हळद उत्पादनात अग्रेसर होता. मल्लांचे गाव अशीही गावाची आहे.

शिंदे यांची पोल्ट्री व्यवसाय परंपरा

बेणापूर गावातील कृष्णदेव गुंडा शिंदे यांचे नाव पोल्ट्री व्यवसायात या भागात अग्रक्रमाने घेतले जाते. पंचक्रोशीत त्यांना बाळासाहेब नावाने ओळखले जाते. पायजमा, तीन बटणी शर्ट आणि डोक्यावर टोपी असा साधा पेहराव. एकत्र कुटुंब पद्धतीतील शिंदे कुटुंबाचे ते आज प्रमुख आहेत. सन १९७३ मध्ये जुन्या मॅट्रिकचे शिक्षण त्यांनी घेतले आहे.

घरची २० एकर शेती. काही बागायती. उर्वरित कोरडवाहूच. त्यामुळे शेतीतून उत्पन्न मिळणे मुश्कीलच होते. त्यांच्या वडिलांनी शेतीत कष्ट उपसून घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. पण निव्वळ शेतीवर प्रपंच चालणे शक्य नव्हते. मग शेतीला पूरक दुग्धव्यवसाय, किराणा दुकान सुरु केले.

‘पोल्ट्री’ व्यवसायात पदार्पण

विटा शहर गावापासून जवळ असल्याने कृष्णदेव यांचे कामानिमित्त तेथे येणे-जाणे व्हायचे. त्यावेळी शहर परिसरात पोल्ट्री व्यवसायाला आलेली गती त्यांच्या लक्षात आली होती. सुलतानगादे येथील शाळेतील मित्र रामभाऊ जाधव व त्यांचे बंधूही या व्यवसायात होते.

त्यांनीही कृष्णदेवांना या व्यवसायासाठी प्रेरणा देत लागेल ती सर्व मदत करू असे आश्‍वासन दिले. त्यातून १९८६ मध्ये एक हजार लेयर पक्षांपासून कृष्णदेव यांनी व्यवसायात पदार्पण केले. विटा भागातील विविध पोल्ट्री उद्योगांना भेटी, कृषी विभागाकडून प्रशिक्षण व विविध मेळावे यातून ज्ञानवृध्दी केली.

विक्री व्यवसाय केला भक्कम

अविरत कष्ट व व्यवस्थापनात सुधारणा करीत व्यवसायात जम बसविला. व्यापारी ‘पोल्ट्री फार्म’वर येऊन अंड्याची खरेदी करायचे. त्या काळात मिरज, विटा परिसरात अंडी विक्री करण्यामध्ये

अडचणी यायच्या. दरम्यान ठोक व्यापाऱ्यांची ओळख झाली. त्यातून ‘मार्केट’चा सखोल अभ्यास केला. सन २०१२ च्या दरम्यान व्यापाऱ्यांची साखळी विकसित केली. अंड्यांना मागणी वाढू लागली. अशावेळी वाहतुकीसाठी मोठे वाहन घेतले.

विक्री व्यवस्था मजबूत केली. आज सांगली, सातारा, पुणे रत्नागिरी आदी ठिकाणच्या ठोक व्यापाऱ्यांना विक्री होते. गरज भासल्यास विटा परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांकडून अंड्यांची खरेदी होते.

खाद्य निर्मितीत स्वयंपूर्णता

पोल्ट्री व्यवसायात भांडवल सतत हाताशी लागते. यात सर्वाधिक खर्च खाद्यावर होतो. हे लक्षात घेऊन कृष्णदेव यांनी जुने यंत्र खरेदी करून स्वतःच खाद्य निर्मिती युनिट सुरू केले. त्यातून दर्जेदार प्रथिनयुक्त खाद्य गुणवत्ता मिळवण्याबरोबर त्यावरील खर्चात बचत केली.

प्रति दिन दहा टन खाद्यनिर्मिती क्षमता असली तरी पक्षांची गरज ओळखून दररोज साडेचार ते पाच टन खाद्य तयार केले जाते. येथेच गोदाम असून तीन सायलोही आहेत. गोदाम, सायलो ते खाद्यनिर्मितीपर्यंत स्वयंचलित पद्धती तयार केली आहे.

अर्थकारण

सुमारे ८० आठवड्याच्या काळात प्रति पक्षी ४७० ते ४९० पर्यंत अंडी देतो. प्रति अंडे उत्पादन खर्च सुमारे ४ रुपये २० ते ३० पैसे असतो. अंड्यांचे दर सातत्याने बदलतात. कधी ते उत्पादन खर्चापेक्षा कमी तर कधी वाढतात. वर्षाची सरासरी अभ्यासल्यास प्रति पक्षी १० ते २० टक्के नफा मिळेल असे नियोजन व व्यवस्थापन होते.

वर्षाला सुमारे पाचहजार रुपये प्रति टन दराने कोंबडीखताची विक्री होते. त्यातून काही लाखांच्या आसपास पूरक उत्पन्न मिळते.

असा आहे पोल्ट्री व्यवसाय

सुमारे ३८ वर्षांपूर्वी एकहजार पक्षांपासून सुरू झाली होती सुरवात. टप्प्याटप्प्याने दोनहजार, नऊहजार असे करीत आजमितीला ४८ हजार पक्षांचे होते संगोपन.

एका प्रसिद्ध कंपनीच्या मिरज येथील हॅचरी युनिटमधून प्रति पिलू ४३ रुपये दराने खरेदी होते.

एकूण पाच ते सहा शेडस आहेत. पैकी दोन शेडस या पिल्लांच्या वाढीसाठी आहेत. येथे १२ आठवडे एक दिवसीय पिल्लांची वाढ होते. त्यानंतर मुख्य लेयर शेडमध्ये त्यांचे स्थलांतर केले जाते.

दररोज सकाळी शेडची स्वच्छता ठेऊन ‘हायजेनिक’ अवस्था ठेवली जाते. प्रथिनांचा विनाकारण मारा न करता काटेकोर खाद्य व्यवस्थापन.

व्यवसायातून प्रगती

कृष्णदेव सांगतात की पोल्ट्री व्यवसायात स्वतः व दररोज लक्ष देणे तसेच दरांबाबत सतत जागरूक राहावे लागते. त्यांना व्यवसायात बंधू उद्धव, चंद्रकांत यांची मोठी मदत होते. आज याच व्यवसायातून टप्प्याटप्प्याने एकेक शेड उभारणे, पक्षांची संख्या वाढवणे, फीडमील उभारणे,

वाहतुकीसाठी वाहने घेणे आदी प्रगती करता आली. आजमितीला सव्वा दोन कोटींपर्यंत गुंतवणूक आहे. वार्षिक उलाढाल अडीच ते तीन कोटी रुपयांपर्यंत आहे. जोडीला दोन ठिकाणी सराफी व्यवसाय दुकाने आहेत.

- कृष्णदेव शिंदे, : ८००७१६२९७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT