Strawberry Farming Agrowon
यशोगाथा

Strawberry Farming : कापूस उत्पादक हिंगणघाट परिसरात बहरली स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्या नजरेसमोर महाबळेश्‍वर येते. परंतु आता स्ट्रॉबेरीची चव चाखण्यासाठी महाबळेश्‍वरला जाण्याची गरज उरलेली नाही. स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग वर्धा जिल्ह्यात यशस्वी झाला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Wardha Strawberry Farming Story : स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्या नजरेसमोर महाबळेश्‍वर येते. परंतु आता स्ट्रॉबेरीची चव चाखण्यासाठी महाबळेश्‍वरला (Mahabaleshwar Strawberry) जाण्याची गरज उरलेली नाही.

स्ट्रॉबेरी लागवडीचा(Strawberry Cultivation) प्रयोग वर्धा जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. कात्री येथील महेश व भारती पाटील या प्रयोगशील शेतकरी दांपत्याने हे कार्य तडीस नेले आहे.

त्यांच्या या प्रयोगशीलतेची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांच्या शिवाराला भेट देत या दांपत्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

हिंगणघाट तालुका हा कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या तालुक्‍यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची संख्याही अधिक आहे. याच तालुक्‍यातील कात्री या जेमतेम लोकवस्तीच्या गावात पाटील कुटुंबीयांची १८ एकर शेती आहे.

या शेतीमध्ये मिरची, टोमॅटो, वांगी, सीताफळ, पपई यांसारखी पिके घेण्यात त्यांचे सातत्य आहे. त्याच्या जोडीला कापूस, तूर, हरभरा यांसारखी पारंपरिक पिकेही घेतली जातात.

या वर्षी पहिल्यांदाच या कुटुंबीयांनी स्ट्रॉबेरी लागवड करून तब्बल ९०० बॉक्‍स (प्रति २५० ग्रॅम प्रमाणे) फळांची विक्रीही साधली आहे.

भारती पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२२ मध्ये याची लागवड करण्यात आली. त्यानंतर आता फळधारणा झाली आहे. पाऊण एकरात दहा हजार रोपे आहेत. मल्चिंग, ठिबकचा वापर या ठिकाणी आहे.

या पिकासाठी तापमान हे ३० अंश सेल्सिअसच्या खाली असावे, असा निकष आहे. सध्या विदर्भातील तापमानात गारवा असल्याने हे शक्‍य झाले. पिकात पोल्ट्री खत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला.

एकूण व्यवस्थापनावर सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च झाला. सध्या ४० ते ५२ ग्रॅमपर्यंत वजनाची फळे वेलीवर आहेत. २५० ग्रॅमच्या बॉक्‍समधून याची विक्री होत आहे. १०० रुपये याची किंमत ठेवली आहे. डॉ. दिलीप देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.

प्रयोग पाहण्यास शेतकऱ्यांची पसंती

राज्यात सुरुवातीला नावारूपास आलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये वर्ध्याचाही समावेश होतो. याच जिल्ह्यात पाटील दांपत्याने वेगळी वाट चोखाळत स्ट्रॉबेरी लागवड केली. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cold Wave: थंडी कायम राहण्याची शक्यता

E Peek Pahani: उमरग्यात खरिपातील ई-पीक पाहणीसाठी ऑफलाइन संधी

Agrowon Podcast: शेवगा दराचा विक्रम; सोयाबीनमधील सुधारणा टिकून, आल्याला उठाव, ज्वारीचे दर टिकून तर हळदीला मागणी

Leopard Terror: शिरूर अनंतपाळ तालुक्यात बिबट्याची दहशत?

Vanrai Bandhara: पूर्व विदर्भात महिन्यात १४१९ वनराई बंधारे पूर्ण; शेतीला दिलासा

SCROLL FOR NEXT