Cotton Processing Agrowon
यशोगाथा

Cotton Processing : सरकी तेल, ढेपनिर्मितीतून शेतीला प्रक्रिया उद्योगाचे बळ

Agriculture Processing : रेल (जि. जळगाव) येथील चंद्रकांत पाटील यांनी सरकी तेल व ढेपनिर्मिती सुरू केली आहे. तेलाला जिनिंग व्यावसायिकांकडून, तर ढेपेला परिसरातील पशुपालकांकडून बाजारपेठ मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

चंद्रकांत जाधव

Small processing industries : रेल (जि. जळगाव) येथील चंद्रकांत पाटील यांनी सरकी तेल व ढेपनिर्मिती सुरू केली आहे. तेलाला जिनिंग व्यावसायिकांकडून, तर ढेपेला परिसरातील पशुपालकांकडून बाजारपेठ मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. शेतील जोड म्हणून सुरू केलेल्या या लघू प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्रोत त्यांनी वाढविले आहेत.

जळगाव जिल्ह्यात रेल (ता. धरणगाव) गावचे शिवार कापूस व अन्य पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मध्यम, हलकी जमीन या भागांत असून, काही भागांत जलसाठ्यांची स्थिती चांगली आहे. गावातील चंद्रकांत पाटील यांची १८ एकर शेती आहे. वडील जमनादास एकत्रित कुटुंबात १२५ एकर शेतीचे व्यवस्थापन सांभाळायचे. पुढे शेतीच्या वाटण्या झाल्या. चंद्रकांत यांचा शेतीत वीस वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. दोन कूपनलिका आहेत.देशी गाय, दोन सालगडी, एक बैलजोडी, पॉवर टिलर अशी सामग्री आहे. चंद्रकांत यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेतले. खासगी क्षेत्रात नोकरीचा प्रयत्नही केला. परंतु आता शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. एका राजकीय पक्षाशीही ते संबंधित असून, पदाधिकारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. अर्थात, शेतीकडे मात्र त्यांनी जराही दुर्लक्ष केलेले नसून, उलट शेतीला जोड म्हणून प्रक्रिया उद्योगाची उभारणी अलीकडील दोन वर्षांत केली आहे. लहान बंधू अमोल जळगावात खासगी कापड निर्मिती कारखान्यात कार्यरत आहेत. वडील व बंधूंसह आई आशाबाई, पत्नी रूपाली यांचे मोठे सहकार्य चंद्रकांत यांना असते.

कापूस शेतीतून प्रेरणा

प्रयोगशील वृत्तीतून चंद्रकांत दरवर्षी १५ एकरांत कापूस घेतात. गिरणा काठच्या शेतात तीन एकरांत लिंबाची बागही उभारली आहे. मुख्य पीक कापूस असल्याने त्यावर प्रक्रिया करता येईल का यावर त्यांचे विचार मंथन चालायचे. कृषी यंत्रणांच्याही ते सतत संपर्कात असायचे. कृषी विभाग- आत्मा अंतर्गत ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथेही त्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योग मोठ्या संख्येने आहेत. पण त्यासाठी कोट्यवधीची गुंतवणूक व मोठी जागा हा मोठा प्रश्‍न होता. पुरेशा अभ्यासाअंती सरकी तेल व ढेपनिर्मिती हा लघू उद्योग आपल्यासाठी किफायतशीर ठरेल असे त्यांना वाटले. नगर येथील खासगी संस्थेत त्या अनुषंगाने प्रशिक्षणही घेतले.

सुरू झाला उद्योग

आपल्या गावातील शेतात साडेतीन हजार चौरस फूट जागेत बळीराजा कृषी प्रक्रिया उद्योग नावाने चंद्रकांत यांनी प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. राजकोट (गुजरात) येथून त्यासंबंधी यंत्रणा आणली. पंचवीस लाख रुपये गुंतवणूक केली. राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जही घेतले. चोवीस तास वीज उपलब्ध करून घेतली. दोन कामगार येथे कार्यरत आहेत. सरकी तेलाच्या (क्रूड ऑइल) उत्पादनाचे प्रति महिना सहा टन उद्दिष्ट असते. सध्या त्याला किलोला ७२ रुपये दर असून, तो ८२ ते ८५ रुपयांपर्यंतही जातो. स्थानिक जिनिंग प्रेसिंग कारखानदार किंवा तेल शुद्धीकरण व निर्मिती (रिफायनरी) कारखान्यांकडून खरेदी केली जाते.

ढेपेची बाजारपेठ


रेल परिसरात दूध उत्पादकांची संख्या अधिक आहे. चंद्रकांत यांनी ही संधी हेरली.
कृषी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. गावोगावी दौरे केले. दूध उत्पादकांशी संपर्क वाढविला. आज त्यांनाच मलई मख्खन या नावाने थेट विक्री केली जाते. परिसरातील गावांमधील दूध उत्पादकही खरेदीसाठी केंद्रात येतात. बाजारातील प्रचलित ढेपेपेक्षा आपली ढेप अधिक दर्जेदार कशी राहील याकडे लक्ष दिले आहे. दुधाळ जनावराला आवश्‍यक अन्नघटक व तेलाची योग्य मात्रा असलेली ढेप मिळाल्यास दुधातील फॅट वाढण्यास मदत होते. ही बाब लक्षात घेऊन ढेपेत तेलाचे प्रमाण ७.३५ एवढे राखण्याचा प्रयत्न होतो. सुमारे ३७ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात प्रक्रिया केल्यास ढेपेतील नैसर्गिक घटकांचे नुकसान होते. त्यामुळे तापमान त्यापेक्षा अधिक वाढणार नाही याची खबरदारी घेतली जाते. कोणतेही पॉलिश न करता ढेप नैसर्गिक स्वरूपात राहील याचा प्रयत्न असतो.

ढेपनिर्मितीचे उद्दिष्ट

-प्रक्रियेसाठी दर महिन्याला १५ टन सरकीची आवश्‍यकता. यंदा सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने कारखानदारांकडून त्याची खरेदी.
-दूध उत्पादकांची संख्या परिसरात वाढत आहे. त्यामुळे ढेपेलाही वाढती मागणी.
-सुरुवातीला दररोज १५ ते १८ पोती (प्रति पोते ६५ किलो क्षमता) होणारे उत्पादन वा विक्री आता २१ ते २२ पोत्यांपर्यंत. दर १९०० ते दोन हजार रुपये प्रति पोते या दरम्यान. सध्या दर १९०० रुपये.
-बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतरांपेक्षा आपले दर कमी कसे राहतील याचा विचार.
-कमी तेलयुक्त ढेप हवी असल्यास तसेही उत्पादन.

अर्थकारण
चंद्रकांत सांगतात की तेल व ढेपनिर्मिती उद्योगातून सुमारे ३० ते ३५ टक्के नफा मिळतो.
त्यातही या भागात पशुपालकांची संख्या जास्त असल्याने ढेपेच्या उलाढालीतील नफ्याचे प्रमाण
अधिक आहे.

ठळक बाबी
-तत्कालीन कृषी उपसंचालक अनिल भोकरे, समाधान पाटील, ‘आत्मा’चे धरणगाव येथील तालुका समन्वयक दीपक नागपुरे यांचे मार्गदर्शन.
-‘आत्मा’च्या मदतीने गावात बळीराजा कृषी विज्ञान मंडळाची स्थापना. गावातील नाला खोलीकरण कामातही चंद्रकांत यांचा सहभाग.

चंद्रकांत पाटील, ९८३४७४०००९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT