Sarki Oil : बहुगुणी सरकी तेल माहितीअभावी दुर्लक्षित

Cotton Seed oil : संदीप बाजोरिया; जगभरात होतो सरकीच्या तेलाचा वापर होतो. सरकी तेल अधिक पोषक, तळणासाठी सर्वोत्तम, पदार्थांची वाढविते.
Sarki Oil
Sarki OilAgrowon
Published on
Updated on

Cotton Seed Processing : पुणेः अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये स्वंयपाकघरात सरकीच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, भारतात सरकीचे उत्पादन इतर तेलबियांपेक्षा अधिक असूनही सरकीच्या तेलाचे उत्पादन आणि वापर याबत उदासीनता दिसून येते. त्यामुळे सरकी प्रक्रिया उद्योगाचे आधुनिकीकरण आणि प्रसाराद्वारे मूल्यसाखळीचा अपेक्षित विकास साधने शक्य होईल, असे ऑल इंडिया कॉटनसीड (Cotton Seed) क्रशर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बाजोरिया यांनी व्यक्त केले.

साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि दि ऑल इंडिया कॉटनसीड क्रशर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या कॉटनसीड ऑईल कॉन्क्लेव्ह-२०२३ च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. बाजोरिया पुढे म्हणाले, की भारत हा जगातील प्रमुख तेलबिया उत्पादक देशांपैकी एक आहे. देशात भुईमूग, मोहरी, सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, करडई सारख्या तेलबियांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. याच्या सोबतीला आता कापूस, नारळ आणि ऑइल पाम यांसारखी खाद्यतेलाची पिके घेतली जात आहेत.

अलिकडेच, भारताने भाताच्या भुसापासून (राईस ब्रॅन ऑइल) तेलाचे उत्पादन सुरू केले आहे. विशेष  म्हणजे भारतात याचे उत्पादन १० लाख टन असून ते चीन आणि जपानच्या पुढे आहे. अलिकडेच भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक झाल्यानंतर मागील काही वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व प्रमुख तेलबियांमध्ये सरकीचे उत्पादन सर्वाधिक होत असून त्याने सोयाबीन, मोहरी आणि भुईमूगालाही मागे टाकले आहे.

सरकी "गोल्डन गूज' 
सरकीवर प्रक्रिया करून तेल आणि पेंड तयार होते. त्याचा किफायतशीर पशुखाद्य म्हणून वापर होतो. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्यबीज व्यवसायात पशुखाद्य म्हणून वापर होऊ शकतो. याच प्रक्रियेतून कॉटन लिंटर्स, हल्लस् हे किंमती उपपदार्थ देखील तयार होत असल्याने मूल्यवर्धन साधता येते. खाद्यतेल आयातीवर खर्च होणारे आणि देशासाठी महत्त्वाचे परकीय चलन वाचवते. अश्या विविध गुणांनी ठासून भरलेली आणि तुलनेने स्वस्त असलेली सरकी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरू शकते. परंतु, त्यासाठी सरकी प्रक्रिया उद्योगाचे आधुनिकीकरण अत्यंत गरजेचे आहे.

Sarki Oil
Edible Oil : तळलेलं तेल पुन्हा वापरताय !

खाण्यासाठी उपयुक्त तेल
भारतात कापूस लागवड केवळ वस्त्रोद्योग विकासासाठी केली जाते. तर सरकीचा वापर प्रामुख्याने पेंड उत्पादनासाठी. मात्र खाद्यतेलाकडे दुर्लक्ष केले जाते. सर्वाधिक टिकाऊ असलेले सरकी तेल गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागात खाण्यासाठी वापरले जाते. याउलट अमेरिकेत सन १८०० पासून सरकी तेलाला 'अमेरिकेचे मूळ वनस्पती तेल' हा दर्जा मिळाला आहे. तेथे सॅलड ड्रेसिंगसाठी देखील या तेलाचा चांगला वापर केला जातो .

सरकी तेल बहुगुणी
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी (सीआयआरसीओटी), आयसीएआर, मुंबईच्या शास्त्रज्ञांच्या मते तीळ, करडई आणि शेंगदाणा, मोहरी, ऑलिव्ह आणि बदाम यांच्या तुलनेत कापूस बियांचे तेल फॅटी ऍसिडचा उत्कृष्ट स्रोत आहे. या तेलामध्ये कॅरोटीन आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या स्वरूपात उच्च प्रमाणात आणि प्रभावी प्रो-व्हिटॅमिन ए असतात. कापूस बियांच्या तेलाला 'हार्ट ऑईल' म्हंटले जाते. पारंपरिक तेलामध्ये सुमारे ३०% तर कापूस बियाण्यांच्या तेलामध्ये ५०% आवश्यक पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. हे कोरोनरी धमन्या कडक होण्यापासून प्रतिबंधित करते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या ‘ओके’ खाद्यपदार्थांच्या यादीतील काही तेलांपैकी हे एक आहे. कोलेस्ट्रोल मुक्त असलेल्या या तेलात चरबीचे प्रमाण कमी असल्याचे बाजोरिया यांनी यावेळी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com