Cottonseed Oil : सरकी तेल उत्पादनात मोठ्या संधी; अत्याधुनिक प्रक्रिया पध्दतीचा वापर गरजेचा

Saraki Oil : भारत कापूस उत्पादनात चीननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन २९८ ते ३४३ लाख गाठींच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. देशातील उत्पादनाचा निश्चित अंदाज अद्यापही बांधता येत नाही. पण देशात यंदा १३ ते १४ लाख टन सरकी तेल उत्पादन झाले.
Saraki Oil
Saraki OilAgrowon

Cotton Production : पुणेः भारत कापूस उत्पादनात (Cotton Production) चीननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन २९८ ते ३४३ लाख गाठींच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. देशातील उत्पादनाचा निश्चित अंदाज अद्यापही बांधता येत नाही. पण देशात यंदा १३ ते १४ लाख टन सरकी तेल उत्पादन झाले.

ते २०२५ पर्यंत १५ ते १६ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे, असे साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया काॅटनसीड क्रशर्स असोसिएशनने म्हटले आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या सरकी, सरकी तेल आणि सरकी पेंड परिषदेत याविषयी मंथन झाले. ऑल इंडिया काॅटनसीड क्रशर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बाजोरिया यांनी सांगितले की, उद्योग आता सरकी प्रक्रियेत आधुनिक तंत्राचा वापर करत आहे. त्यामुळे कार्यक्षमता वाढली. परिणामी देशाचा फायदा होत आहे. 

नागपूर येथील कापूस  संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एम साबेश म्हणाले की, देशातील कापूस उत्पादनातही चांगली वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्र आणि अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब केल्यास २०२५ पर्यंत देशाचे कापूस उत्पादन ४०२ लाख गाठींवर पोचेल. परिणामी देशात सरकी, सरकी तेल आणि सरकी पेंडेची उपलब्धताही वाढेल. 

Saraki Oil
Banana Farming : आदर्श शेती पध्दतीचा केळीत वापर गरजेचा

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार देशात यंदा १३ ते १४ लाख टन सरकी तेल मिळाले. कापूस उत्पादन वाढल्यास सरकी तेलाचे उत्पादनही २०२५ पर्यंत १५ ते १६ लाख टनांवर पोचेल.

सरकीवर शास्त्रशुध्द पध्दीतीने प्रक्रिया केल्यास तेल यापेक्षा जास्तही मिळू शकते. देशात सरकी तेल उत्पादन वाढल्यास महत्वाचे खाद्यतेल म्हणून पुढे येऊ शकते, असेही जाणकारांनी सांगितले. 

देशाचा खाद्यतेल वापर

एसईएच्या मते देशात २०२२-२३ मध्ये २४० लाख टन खाद्यतेलाचा वापर झाला. खाद्यतेलाचा वापर वाढती लोकसंख्या आणि वाढत्या दरडोई उत्पन्नानुसार वाढत जाईल. सध्या भारत केवळ १०० लाख टन खाद्यतेलाचे उत्पादन करतो. तर उर्वरित १४० लाख टन आयात केली.

देशात खाद्यतेल उत्पादनात खूप संधी आहे. सरकी प्रक्रियेच्या पारंपरिक पध्दतीत मोठ्या प्रमाणात तेल वाया जाते. आधुनिक पध्दतीचा अवलंब केल्यास तेल उत्पादनात वाढ होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com