Alu Farming Agrowon
यशोगाथा

Alu Farming : आनोरे गावच्या अळूची सर्वत्र ख्याती गवती चहा, पुदिन्यातही ओळख

Farmer Success Story : जळगाव जिल्ह्यातील आनोरे गाव कपाशीसह अळूच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अनेक पिढ्यांपासून येथील शेतकऱ्यांनी अळूचे पारंपरिक वाण जोपासले आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : जळगाव जिल्ह्यात धरणगाव या तालुका शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर आनोरे गाव गाव आहे. कापूस उत्पादनात ते आघाडीवर आहेच. पण कापसासोबत अळूच्या शेतीतही या गावची ओळख आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या या गावचे शिवारक्षेत्र सुमारे ३५० हेक्टर आहे. शिवारातील शेती मध्यम, पाण्याचा निचरा होणारी आहे. मोठी नदी नसल्याने कृत्रिम जलसाठे कमी आहेत.

या स्थितीत गावाने मुख्य नाल्याचे रुंदी-खोलीकरण करून जलसंधारणात आघाडी घेतली. त्यामुळे काही विहिरींना जलसाठे मुबलक तयार झाले आहेत. पाऊस कमी पडतो त्या वेळी रब्बी हंगामावर परिणाम होतो. गावाच्या शिवारातून गिरणा नदीवरील धरणातून आलेला पाट जातो. गिरणा धरणात जलसाठा मुबलक राहिल्यास पाटाच्या पाण्यावर रब्बी हंगाम चांगला साध्य करता येतो. विहिरी, कूपनलिकांना जलसाठा टिकून राहतो.

अळूच्या शेतीतील गाव

गावातील बहुतांश शेतकरी अळूशेतीत गुंतलेले आढळतात. अर्धा- एक ते दोन एकरांत हे क्षेत्र असते. दोन ते पाच गुंठ्यात गवती चहा आणि दीड ते दोन गुंठ्यात पुदीना अशी जोडही काहींनी अळूला दिली आहे. गावात एकूण मिळून ५० एकरांपर्यंत बारमाही अळूचे क्षेत्र असावे. पाऊसमान चांगले असते त्या वर्षी हे क्षेत्र १० ते १५ एकरांनी वाढते. अळूला दर आठ दिवसांनी काढणी व अन्य कामांसाठी मजूर अधिक लागतात.

त्यांचा अंदाज घेऊनच शेतकरी क्षेत्र मर्यादित ठेवतात. क्षेत्र वाढविल्यास अन्य पिकांकडे तेवढा वेळ देणे शक्य होत नाही. गावात अळूचे वाण मागील पिढीकडून पुढील पिढीपर्यंत आले आहे. वर्षानुवर्षे ते इथल्या शेतकऱ्यांनी जोपासले आहे. अळूचे एका क्षेत्रातील पीक आटोपल्यानंतर कंद काढले जतात. उष्णतेचा त्यास फटका बसण्याची शक्यता असतो. त्यामुळे प्रक्रिया करून कंद सावलीत ठेवले जातात.झाडाखाली ओल्या तागाच्या गोण्या कंदांवर ठेवून तापमान नियंत्रणाचा प्रयत्न केला जातो.

अशी होते अळूची शेती

जूनमध्ये लागवड होते. पण उन्हाळ्यात भाजीपाल्यांचा तुटवडा व त्यामुळे चांगले दर मिळत असल्याने काही शेतकरी डिसेंबर- जानेवारीतही लागवड करतात. तणनियंत्रणासह काढणीसाठी मजुरीचा खर्च वगळल्यास बाकी खर्च कमी असतो. लागवडीनंतर ७५ ते ८० दिवसांनी काढणी सुरू होते. पुढे सहा महिने काढणी सुरूच असते. मे ते सप्टेंबर या काळात उत्पादन अधिक असते. काही शेतकरी एकरात महिन्याला ८० हजारांपर्यंत अळूच्या पानांचे उत्पादन घेतात. एकसारख्या, मऊ पानांना बाजारात चांगली मागणी असते.

मागणी व दर

मार्चनंतर अळूला प्रति नग दीड रुपये व काहीवेळेस दोन रुपये दर मागील दोन- तीन वर्षे मिळाला आहे. जूनच्या मध्यात मागणी कमी होते. पुढे दोन ते तीन महिने दर कमीच असतात. या काळात उत्पादन अधिक येते. पावसाळ्यात ८० ते ९० रुपये प्रति शेकडा असे दर मागील काळात मिळाले.

अळूच्या शेतीला एकरी सुमारे ३० हजार रुपये खर्च येतो. मजुरीचा खर्च वेगळा आहे. हवामान, उत्पादन व दर या सर्व गोष्टी साधल्या तर एकरी निव्वळ नफा कमाल सव्वा लाख रुपये देखील होऊ शकतो. काही शेतकरी प्रदर्शने व अन्य भागांत अळूच्या कंदांची विक्री करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT