एकनाथ खडसेंच्या शेतीत सीडलेस जांभूळ, चवदार खजूर अन सहा फूट लांब भोपळा
एकनाथ खडसेंच्या शेतीत सीडलेस जांभूळ, चवदार खजूर अन सहा फूट लांब भोपळा 
यशोगाथा

एकनाथ खडसेंच्या शेतीत सीडलेस जांभूळ, चवदार खजूर अन सहा फूट लांब भोपळा

Chandrakant Jadhav

राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला चेहरा म्हणजे एकनाथ खडसे. राजकारणात सक्रिय असूनही दुसरीकडे प्रयोगशील, अभ्यासू शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख आहे. कोथळी (जि. मुक्ताईनगर) येथील आपल्या ११० एकरांत फळबागा, जलसंधारण, यांत्रिकीकरणासह सीडलेस जांभूळ, खजूर लागवडीचे दिशादर्शक प्रयोग त्यांनी केले आहेत. राजकारणापेक्षा शेतीत राबण्याचा आनंद व अनुभवच काही वेगळा असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एकनाथ खडसे ४० वर्षे सक्रिय आहेत. मुक्ताईनगर येथील जय किसान सहकारी पीक संरक्षण संस्था, सहकारी खरेदी विक्री संघापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द त्यांना विधानसभेपर्यंत घेऊन गेली. शेतीचे प्रश्‍न व त्यावर उत्तर शोधण्याचा त्यांचा कटाक्ष कायम असतो. पाटबंधारे मंत्री, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते, महसूल, कृषिमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. शेतीत रममाण झालेले खडसे राजकारणात व्यस्त असलेल्या खडसे यांनी कोथळी (जि. मुक्ताईनगर) येथील शेतीची आवड लहानपणापासून जपली. सन १९७७-७८ पासून शेतीकामांना जुंपून घेतले. कोळपणी, बैलगाडी, ट्रॅक्टर चालवणे, बियाणे, खतवापर अशा सर्व कामांत ते कुशल आहेत. शेतकरी मित्र, तज्ज्ञांसोबत त्यांच्या तंत्रज्ञान विषयक चर्चा कायम सुरू असतात. जलसंधारणाचे प्रयोग देखील फार पूर्वीपासून शेतात केले आहेत. प्रयोगशील शेतीवर दृष्टीक्षेप

  • खडसे केळी उत्पादक म्हणून परिचित होते. मेहनत घेऊन उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न त्यांनी केला. परंतु अडचणी लक्षात घेता त्याचे क्षेत्र मागील काही वर्षांत शून्यावर आणले. दहा वर्षांत बहुतांश शेती फळपिकांखाली आणली.
  • १५ एकरांत आंबा, ३० एकर मोसंबी, पाच एकर लिंबू, दोन एकर संत्री, १५ एकरांत खजूर व शेवग्याची मिश्र बाग
  • संपूर्ण शंभर एकरांत ठिबक. स्प्रिंकलरचाही वापर
  • सुमारे ४५ एकरांत खरीप, रब्बी आदी पिके.
  • फळांची विक्री नजीकच्या मलकापूर (जि.बुलडाणा), बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारपेठेत.
  • फळबागांमुळे पाणी, मजुरी, श्रम पूर्वीच्या तुलनेत कमी झाले.
  • पूर्वी इक्रिसॅट पद्धतीने भुईमुगाचे प्रयोग, खानदेशच्या प्रसिद्ध मिरचीचीही लागवड
  • पूर्वी ट्रॅक्टरद्वारे मशागत, शेतमाल वाहतूक खडसे स्वतः करायचे. सध्या मोठे व मिनी ट्रॅक्टर्स आहेत. गरजेनुसार भाडेतत्त्वावर बैलजोडीचा वापर
  • सहा विहिरी, हतनूर धरणातून जलवाहिनी. तीन सालगडी.
  • सीडलेस जांभळाचा प्रयोग सातपुडा पर्वतालगत मध्य प्रदेशातील आशीरगड, नेपानगर भागात बिनबियांच्या जांभळांची (सीडलेस) झाडे आढळतात. यावल तालुक्यातील (जि.जळगाव) विरोदा गावठाण क्षेत्रातही ५० वर्षे जुने दोन तीन वृक्ष आहेत. या भागातील विक्रेते मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर, रावेर भागात २५० रुपये प्रति किलो दराने ही जांभळे विक्रीस आणतात. खडसे विधानसभेत असताना दरवर्षी मुंबईतील सहकारी, अधिकाऱ्यांना ही जांभळे खाऊ घालायचे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर कार्यरत असताना या जांभळाचे वाण विकसित होण्यासाठी त्यांनी शास्त्रज्ञांचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर कृषीमंत्रीपदी कार्यरत असण्याच्या काळात त्याची उतीसंवर्धित रोपे तयार करण्यात यश आले. असे आहे सीडलेस जांभूळ

  • शिवारात सुमारे १८ झाडे. त्यातील १० ते ११ झाडांना यंदा म्हणजे पाचव्या वर्षी रसाळ फळे लगडली.
  • द्राक्षांच्या घडांप्रमाणे दिसणारी, दर्जेदार रंग, चवीची फळे.
  • जूनच्या अखेरीस फुले. जुलैच्या मध्यात खाण्यायोग्य. जुलैअखेरपर्यंत हंगाम
  • खडसे म्हणतात की प्रति झाड ५० किलो फळे व किलोला १०० ते २५० रुपये दर मिळाला तरी एक झाड कमी खर्च, कमी पाणी व कमी देखभालीत पाचहजार ते १२ हजार रुपयांचे उत्पन्न देऊ शकते.
  • हे वृक्ष ४० वर्षांहून अधिक काळ वाढू शकतात. मोठा वृक्ष एक क्विटंलपर्यंत फळे देऊ शकतो.
  • कृषी विद्यापीठ व शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांपर्यंत या वाणाचा प्रसार करावा. वृक्षांचे जतन व्हावे अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात.  
  • पंधरा एकरांत खजूर
  • खजूर या वाळवंटी प्रदेशातील फळाचा प्रयोग १५ एकरांत
  • मित्र शिवाजीराव जाधव यांनी मुक्ताईनगरनजीक कारखान्यात त्याचा प्रयोग यशस्वी केला. हीच प्रेरणा खडसे यांना मिळाली.
  • साधारण चार वर्षांनी फळे येतात. वाढ होते तशी फळे अधिक मिळतात. प्रति झाडाला ५० ते ६० किलो फळे येतात. ८० ते १०० रुपये प्रति किलो दर. फळे पिवळीधमक, चवदार, शर्करायुक्त
  • त्यास जळगाव, बुलडाणा, मध्य प्रदेशात बाजारपेठ तयार होऊ शकते.
  • एक झाड पाचहजार रुपयांचे उत्पन्न देऊ शकते. लागवडीचा खर्च मुख्य आहे. पुढे तो कमी आहे. -शासनाने फलोत्पादन योजनेत समावेश करून त्याला अनुदान द्यावे, पीकविमा संरक्षण द्यावे अशी अपेक्षा खडसे व्यक्त करतात.
  • भोपळा वाणाचे जतन कोथळी येथील मंदिरातील पुजाऱ्याने भोपळ्याचे दिलेले पारंपरिक वाण खडसे यांनी आपल्या शेताच्या बांधावर लावून जतन केले आहे. वेलींना पाच ते सहा फूट लांबीचे भोपळे येतात. चवदार, आरोग्यदायी हा भोपळा नातेवाइकांसह मित्रांनाही देण्यात येतो. प्रतिक्रिया  राजकारण व शेती या दोन्हीमध्ये मला शेतीच जास्त आवडते. लहानपणापासूनच मी शेतीशी एकरूप झालेलो आहे. माझे घर शेतातच आहे. राजकारण अस्थिर आहे. पण शेतीत कितीही संकटे, आव्हाने आली तरीही तीच स्थिर व शाश्‍वत आहे. ॲग्रोवनचा तर मी पहिल्या दिवसापासूनचा निष्ठावान वाचक आहे. एकनाथ खडसे - ९८२३०७३६६७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT