यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी भुईमुग पिकात सुधारित तंत्रज्ञानााच वापर करू लागले आहेत. त्याद्वारे एकरी उत्पादन वाढवणे त्यांना शक्य झाले आहे. जिल्ह्यात भुईमुगाखालील क्षेत्रही आश्वासक आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, महागाव हे दोन तालुके भुईमुगाचे ‘हब’ म्हणून नावारूपास आले आहेत. दरवर्षी या दोन तालुक्यांतील क्षेत्र वाढते आहे. आर्थिक स्थिती सावरण्यास हे पीक साह्यभूत ठरले आहे. त्यामुळेच या पिकाची कास शेतकऱ्यांनी सोडलेली नाही. पावसाची उपलब्धता पाहून लागवड क्षेत्र कमी अधिक होते. यंदा जिल्ह्यात सुमारे ७८०० हेक्टरवर भुईमूग लागवड आहे. त्यातील सर्वाधिक २४२५ हेक्टर क्षेत्र एकट्या पुसद तालुक्यात आहे. कपाशीवर या वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशी काढून अनेकांनी भुईमूग लागवड केली. विदर्भातील मातीत झिंक व फेरसची कमतरता आहे. शेतकरी त्यानुसार खतांचे व्यवस्थापन करतात. सुधारित तंत्राचा वापर हिवरी (ता. यवतमाळ) येथील किशोर सरोदे भुईमूग पिकातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षांपासून त्यांनी या पिकात सातत्य राखले आहे. मागील वर्षी त्यांना एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. एखादे दुसरे वर्ष रोग किंवा तत्सम समस्येमुळे अत्यंत कमी उत्पादनाचेही मिळते. तरीही उन्हाळी हंगामात सरासरी ८ ते १० क्विंटल उत्पादन त्यांना मिळते. सुधारित तंत्राचा वापर हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. भुईमुगातील व्यवस्थापन
डेरे यांचे अनुभव यवतमाळ तालुक्यातील हातोला येथील किरण डेरे यांचे वडील जयप्रकाश श्रीराम डेरे पाच एकरांपर्यंत भुईमूग घ्यायचे. गेल्या दहा वर्षांपासून शेतीची सूत्रे किरण यांच्याकडे आली. त्यानंतर नगदी पिकांवर भर देत त्यांनी भुईमुगासोबतच हळद, आले, हरभरा, गहू आदींच्या लागवडीवर भर दिला आहे. सद्यःस्थितीत दोन एकर क्षेत्रात ते भुईमूग घेतात. वर्षातून एकरी तीन ट्रॉली शेणखताचा वापर ते करतात. एकरी उत्पादकता आठ ते दहा क्विंटलपर्यंत आहे. घरच्या जनावरांसाठी वापरून शिल्लक कुटाराची विक्री केली जाते. दुहेरी फायदा देत असल्याने या पिकात त्यांनी सातत्य ठेवले आहे. संपर्क- किशोर सरोदे, ९८८१२१७१०९ प्रतिक्रिया मागेल त्याला शेततळे, विहिरी, बोअरवेल आणि प्रकल्प या माध्यमातून उन्हाळी हंगामात पाण्याची सोय झाली आहे. त्यातून शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. साहजिकच जिल्ह्यात तेलबियावर्गीय पिकांचे क्षेत्र वाढते आहे. यातून चांगले उत्पन्न मिळते. -नवनाथ कोळपकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ भुईमुगाची बाजारपेठ विदर्भात भुईमूग विक्रीसाठी अमरावती आणि वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या बाजार समित्यांचा पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी कारंजा येथे भुईमूग विक्रीस आणतात. कारंजा बाजार समितीत सन २०१८-१९ मध्ये बारा हजार पाचशे क्विंटल आवक झाली. त्यास कमाल ५१०० रुपये, सरासरी ४००० रुपये क्विंटल दर राहिला. सन २०१९-२० मध्ये ३४ हजार क्विंटल आवक, तर ६३८५ रुपये दर राहिला. मागील वर्षी म्हणजे २०२०-२१ मध्ये पंचवीस हजार क्विंटल आवक झाली अशी माहिती बाजार समिती सचिव नीलेश भाकरे यांनी दिली. यवतमाळ, अकोला, अमरावती जिल्ह्यांच्या काही भागातून कारंजा बाजार समितीत भुईमूग आवक होते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवड क्षेत्र कमी जास्त होते. कारंजा बाजार समितीत यापूर्वी ४० हजार क्विंटलपर्यंत आवक झाली आहे. सोबतच अमरावती बाजार समितीतही ४५ ते ५० हजार क्विंटल आवक हंगामात होते. अमरावतीच्या मेळघाट भागात लागवड होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.