महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभरात प्रसिद्ध आहे. या स्ट्रॉबेरीची टिकवणक्षमता वाढवण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी संघाच्या माध्यमातून ‘प्री कुलिंग’ व रीफर व्हॅन यांची यंत्रणा उभारली आहे. त्याद्वारे विविध राज्यांत स्ट्रॉबेरी पाठवणे शक्य होऊ लागले आहे. त्यातून स्ट्रॉबेरीला चांगला दर व बाजारपेठा मिळवणे शक्य झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील (जि. सातारा) स्ट्रॉबेरीचा गोडवा सर्वांनाच भुरळ पाडणारा आहे. या स्ट्रॉबेरीला देशभरातून सर्वाधिक मागणी असते. तालुक्यात या हंगामात सुमारे अडीच ते तीन हजार एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड आहे. तर जावली, पाटण, वाई, कोरेगाव, सातारा तालुक्यांत सुमारे एक हजार ते १२०० एकर क्षेत्रांवर लागवड झाली आहे. हंगाम सुरू झाला की सुरुवातीच्या काळात कमी उत्पादन उपलब्ध होत असले तरी ताज्या स्ट्रॅाबेरीचे आकर्षण राहते. सुरुवातीच्या काळात स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी राहात असल्याने चांगला दरही मिळतो. उत्पादनात वाढ जास्त होईल तसतसा दरही कमी होत जातो. टिकवणक्षमतेचा विचार
अशी होते प्रक्रिया
अशी आहेत प्रक्रिया केंद्रे
या तंत्रज्ञानाचे झालेले फायदे
प्रतिक्रिया- फळे साठवणूक तंत्रज्ञानाचा आम्ही अत्यंत बारकाईने व शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करतो आहोत. जागतिक बॅंक पुरस्कृत केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत कर्ज घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचे कोल्ड स्टोरेज उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या दोन रेफर व्हॅन भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. - गणपत पार्टे - ९४२३०३३८०९ (अध्यक्ष श्रीराम फळप्रक्रिया सहकारी संस्था, भिलार.) काढणीनंतर स्ट्रॉबेरी अधिक टिकविण्याच्या उद्देशाने आम्ही प्री कुलिंग यंत्रणेची युनिट्स उभी केली आहेत. यातून दैनंदिन चार टन प्री कुलिंग केले जाते. अगदी दूरवरच्या बाजारपेठेतील ग्राहकांपर्यंत ताजी व दर्जेदार स्ट्रॉबेरी पोचवणे त्यामुळे शक्य झाले आहे. - किसनशेठ भिलारे- ९४२२०३८४७४ (अध्यक्ष, महाबळेश्वर सहकारी फळे, फुले, भाजीपाला खरेदी विक्री संघ, महाबळेश्वर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.