Direct sale of onion 
यशोगाथा

रहिवासी सोसायट्यांमध्ये आठ टन कांद्याची विक्री 

लॉकडाऊनमुळे बंद पडलेली बाजारपेठ, पडलेले दर अशा स्थितीतही शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील चंद्रशेखर मुरलीधर झुरकाळे यांनी जळगाव शहरात आठ टन कांद्याची थेट ग्राहकांना विक्री केली. जेथे व्यापारी किलोस ६ रुपये दर देत नव्हते, अशा काळात झुरकाळे यांनी प्रति किलोस १५ रुपये दर मिळवत आर्थिक नुकसान टाळण्यात यश मिळविले.

Chandrakant Jadhav

लॉकडाऊनमुळे बंद पडलेली बाजारपेठ, पडलेले दर अशा स्थितीतही शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील चंद्रशेखर मुरलीधर झुरकाळे यांनी जळगाव शहरात आठ टन कांद्याची थेट ग्राहकांना विक्री केली. जेथे व्यापारी किलोस ६ रुपये दर देत नव्हते, अशा काळात झुरकाळे यांनी प्रति किलोस १५ रुपये दर मिळवत आर्थिक नुकसान टाळण्यात यश मिळविले.  चंद्रशेखर झुरकाळे यांची सात एकर शेती आहे. रब्बीमध्ये सव्वा दोन एकरातील २४ टन कांदा विक्रीस तयार होता. परंतु कोरोनामुळे बाजार समित्यांचे कामकाज विस्कळीत झाले होते. सातत्याने कांद्याचे दर उतरत होते. उत्पादन खर्च निघणे मुश्कील झाले. कांदा विक्रीसाठी झुरकाळे यांनी मित्र, कृषी विभागातील लोकांशी संपर्क साधण्यास सुरवात केली. आत्मा मधील सोनू कापसे, कृषी सहायक कमलेश पवार, भारत पाटील यांनी कांद्याची गुणवत्ता लक्षात घेऊन जळगाव शहरात ग्राहकांना थेट विक्री सल्ला आणि विक्री परवाना मिळवून दिला. 

थेट विक्रीमुळे नफ्यात वाढ  शहरातील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन झुरकाळे यांनी २० किलो गोणीमध्ये कांदा पॅकिंग केले. दर्जेदार कांदा असल्याने ग्राहकांनी पसंती दिली. एप्रिल महिन्यात जळगाव शहरातील पिंप्राळा, खोटेनगर, गुजराल पेट्रोलपंप परिसर, रामानंदनगर, लक्ष्मीनगर, मु.जे.महाविद्यालय परिसर आदी भागातील नाके, निवासी सोसायटीमध्ये जाऊन कांद्याची विक्री सुरू केली. व्हॉट्‌स ॲप आणि कृषी विभागाच्या मदतीने ग्राहकांकडून कांद्याची मागणी नोंदवून थेट विक्री सुरू झाली. पहिल्या पंधरा दिवसात प्रति किलोस २० रुपये आणि नंतरच्या आठ दिवसात १५ रुपये दर मिळाला. झुरकाळे हे कीर्तनकार असल्याने ग्राहकांशी चांगला संवाद साधत कांदा विक्री वाढविली. शिरसोली गाव जळगाव शहरापासून जवळ असल्याने मिनी ट्रॅक्टर वाहतुकीची फारशी अडचण आली नाही.  सव्वा दोन एकरातील कांदा व्यवस्थापनासाठी झुरकाळे यांना ६२ हजार रुपये खर्च आला. त्यांना एकूण २४ टन कांदा उत्पादन मिळाले. यातील आठ टन कांद्याची जळगाव शहरात थेट ग्राहकांना विक्री केली. उर्वरित १६ टन कांदा शेतामध्येच दहा रुपये प्रति किलो दराने व्यापाऱ्याला विक्री केली. जेथे उत्पादन खर्च निघणे शक्य नव्हते, तेथे खर्च वजा जाता दीड लाखांचा निव्वळ नफा झुरकाळे यांनी मिळविला.  -   चंद्रशेखर झुरकाळे, ९११२८२२७११ 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT