Ishwar sapkal while showing turmeric tubers 
यशोगाथा

प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्श

तिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर सपकाळ अभ्यासू शेतकरी आहेत. कष्टपूर्वक व विचारपूर्वक नियोजनातून हळदीच्या चार वाणांची लागवड, पेरू तीन आंतरपिके, कांदा बिजोत्पादन आदी विविध प्रयत्नांद्वारे आपली प्रयोगशील वृत्ती त्यांनी सिद्ध केली आहे.

डॉ. टी. एस. मोटे

तिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर सपकाळ अभ्यासू शेतकरी आहेत. कष्टपूर्वक व विचारपूर्वक नियोजनातून हळदीच्या चार वाणांची लागवड, पेरू तीन आंतरपिके, कांदा बिजोत्पादन आदी विविध प्रयत्नांद्वारे आपली प्रयोगशील वृत्ती त्यांनी सिद्ध केली आहे. त्यांचे प्रयोग शेतकऱ्यांसाठी आदर्श असेच आहेत. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत हळदीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या भागांतील प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये तिडका (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील ३५ वर्षे वयाचे ईश्‍वर सपकाळ यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. शेतीतील नवे तंत्रज्ञान समजावून घेऊन व बाजारपेठेतील मागणी ओळखून त्यानुसार पीक पद्धती व वाणनिवड करण्यात ते पटाईत आहेत. हळदीचे विविध वाण

  • अनेक वर्षांपासून ईश्‍वर हळदीची सुमारे सहा एकरांत शेती करतात. गेल्या वर्षी त्यांच्याकडे सेलम, राजापुरी, आंबेहळद व प्रगती या चार वेगवेगळ्या वाणांखाली मिळून आठ एकर क्षेत्र होते.
  • जिल्ह्यामध्ये अशा वाणांची विविधता व क्षेत्र असलेले ते मोजक्या शेतकऱ्यांपैकी असावेत.
  • ईश्‍वर अनेक वर्षांपासून आले देखील घेतात. त्याच्या दरांमध्ये कायम चढउतार पाहण्यास मिळतात.
  • यातून मार्ग काढण्यासाठी केवळ आल्यावर अवलंबून न राहता हळदीलाचाही पर्याय ईश्‍वर यांनी निवडला.
  • व्यवस्थापनातील बाबी

  • मागील वर्षी दोन एकर नव्या पेरू बागेत गुजरात राज्यातील प्रगती या वाणाची आंतरपीक म्हणून लागवड केली. पेरूच्या दोन ओळींत आठ फुटांचे अंतर आहे. त्यात एक ओळ हळदीची घेतली.
  • सेलम, आंबेहळद व राजापुरी यांची प्रत्येकी दोन एकरांत सलग लागवड केली.
  • त्यासाठी चार बाय चार फुटांवर बेड तयार केले. त्याचा माथा ३० सेंमी. ठेवला. प्रत्येक बेडवर ठिबकची लॅटरल अंथरुन दोन्ही बाजूंना झिगझॅग पद्धतीने हळदीच्या दोन ओळी लावल्या.
  • दोन कंदांमध्ये सहा ते आठ इंचाचे अंतर ठेवले. चारही जातींची लागवड १० ते १५ जूनदरम्यान करण्यात आली. कंद उघडे पडू नयेत म्हणून दोन वेळेस बेडवर माती चढवावी लागते. उघड्या कंदांवर कंदमाशी अंडी घालण्याची शक्यता असते. मूळ बेड व ‘टॉप’ ही एक फूट उंचीचा होता. दोन वेळेस माती लावल्यानंतर बेडची उंची व ‘टॉप’ची रुंदीही वाढते. ६० व १२० दिवसांनी पॉवर टिलरच्या मदतीने बेडवर माती चढवण्यात आली. सरीत पॉवर टिलर चालवला की सोबत माती चढवली जाते व तणनियंत्रणही होते.
  • वाणांचे वैशिष्ट्य

  • ईश्‍वर सांगतात, की सेलम वाण पावडरीसाठी चांगला आहे. तर प्रगती वाण गोदामात अधिक काळ टिकतो. त्यापासून लोणचे तयार करतात. आंबेहळदीपासूनही लोणचे बनवितात. तर राजापुरी वाण लवकर पक्व होणारा म्हणजे सात महिन्यात तयार होणारा आहे. त्यापासून पावडर व लोणचेही तयार करतात.
  • उत्पादन व विक्री 

  • हळदीच्या चारही वाणांचे सरासरी एकरी ओले उत्पादन १५०, १६० ते १७० क्विंटलपर्यंत मिळाले
  • आहे. गुजरातमधील व्यापारी जागेवर येतात. ओल्या हळदीची खरेदी करतात.
  • त्यामुळे पुढील प्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील व्यापारी देखील दरवर्षी या भागातील ओली हळद खरेदी करून गुजरातला पाठवतात.
  • प्रति क्विंटल वाणनिहाय १००० पासून ते १२००, २००० रुपयांपर्यंत दर मिळाला.
  • एकरी खर्च किमान ५० हजार ते ६० हजार रुपये असतो.
  • पेरूत वर्षात तीन आंतरपिके

  • सुमारे दीड वर्षांपूर्वी ८ बाय सहा फूट अंतरावर तैवान पिंक या पेरूच्या वाणाची पाच एकरांवर लागवड केली आहे. त्यातील अडीच एकरांत पेरूच्या दोन ओळींमध्ये एका वर्षामध्ये तीन आंतरपिके घेतली.
  • गेल्या वर्षी खरीप हंगामात मूग घेतला. मात्र अति पावसात काढणी न झाल्याने नुकसान झाले.
  • त्यानंतर कलिंगड घेतले. त्याचे एकूण ५० टन उत्पादन मिळाले. मात्र किलोला ५ रुपये दरांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर भुईमूग घेतला. त्याचे २० पोती किंवा साडेदहा क्विंटल उत्पादन मिळाले. प्रति क्विंटल साडेपाच हजार रुपये दर मिळून अपेक्षित उत्पन्न मिळाले.
  • पेरूचे उत्पादन

  • यंदा जागेवरच पेरूची विक्री एक हजार क्रेट (प्रति क्रेट २० किलो) एवढी विक्री केली आहे,
  • प्रति क्रेट २०० ते ३०० रुपये दर मिळाला आहे. स्थानिक व्यापारी येऊन काढणी करून घेऊन जातात.
  • मका व बाजरी जोडओळ पद्धतीने

  • गेल्या वर्षी सततच्या पावसाने व नंतर आलेल्या गुलाबी बोंड अळीमुळे कापूस लवकर काढावा
  • लागला. त्यानंतर डिसेंबरच्या अखेरीस पाच एकर बाजरी व आठ एकर मक्याची लागवड करण्यात आली. सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे. ठिबकच्या दोन लॅटरलमध्ये चार फुटांचे अंतर आहे.
  • प्रत्येक लॅटरलवर मका व बाजरीच्या दोन ओळी लावण्यात आल्या. बाजरीचे एकरी ३५ क्विंटल तर मक्याचे ४० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याचे ईश्‍वर सांगतात.
  • कांदा बीजोत्पादन कांद्याचे बीजोत्पादन दरवर्षी घेतात. गेल्या वर्षी पाच एकरांत पुणे फुरसुंगी व पाच एकरांत लाल कांदा घेतला. एकूण १७ क्विंटल बियाणे मिळाले. पैकी १२ क्विंटल बियाण्याची विक्री ४० हजार ते ५० हजार प्रति क्विंटल दराने तर पाच क्विंटल विक्री ७५ हजार रुपयांच्या पुढील दराने केल्याचे ईश्‍वर यांनी सांगितले. संपर्क : ईश्‍वर सपकाळ- ८२७५३२१३६३, ९७६४९३९२६८ (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

    Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

    Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

    Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

    Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

    SCROLL FOR NEXT