Wakchare's farm in a scenic dongargaon village in Akole taluka 
यशोगाथा

डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील शेती

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील वाकचौरे कुटुंबाने गुण्यागोविंदाने एकत्रीतपणे शेतीत राबत अभ्यास व परिश्रमातून प्रयोगशील, आदर्श शेती घडवली आहे. डाळिंब, ॲपलबेर, बांधावर विविध फळपिकांसह अन्य पिकांसह सेंद्रिय व्यवस्थापनावर भर देत प्रगतिशील शेतीचा प्रत्यय घडवला आहे.

शांताराम काळे 

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील वाकचौरे कुटुंबाने गुण्यागोविंदाने एकत्रीतपणे शेतीत राबत अभ्यास व परिश्रमातून प्रयोगशील, आदर्श शेती घडवली आहे. डाळिंब, ॲपलबेर, बांधावर विविध फळपिकांसह अन्य पिकांसह सेंद्रिय व्यवस्थापनावर भर देत प्रगतिशील शेतीचा प्रत्यय घडवला आहे.   नगर जिल्ह्यात अकोले हा आदिवासी बहुल व निसर्गसंपन्न असा डोंगराळ तालुका आहे. या भागात जैवविविधता देखील चांगल्या प्रमाणात आहे. येथील अनेक शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या देशी बियाण्यांचा संग्रह करून दुर्मीळ वाण जपण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील डोंगरगाव येथे देविदास वाकचौरे यांची सुमारे ११ एकर शेती आहे. त्यात डाळिंब काही वर्षांपासून तर ॲपलबेरचे पीक सहा वर्षांपासून घेतले जात आहे. देविदास यांचा मुलगा संजय यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत अभ्यासूवृत्तीने व तंत्राचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने शेती फुलवली आहे.  शेतीतील व्यवस्थापन 

  •     दरवर्षी २५० ग्रॅमपासून ते चारशे ग्रॅमपर्यंत व क्वचित प्रसंगी त्याहून अधिक वजनाची डाळिंबे वाकचौरे  यांच्याकडील झाडांना लगडलेली दिसून येतात. अनेक व्यापारी बागेत येऊन खरेदी करतात. प्रति झाड सुमारे ४० किलो व काही प्रसंगी त्याहून अधिक उत्पादन मिळते. गुजरात, कच्छ राजस्थान येथील कृषी अधिकारी व शेतकऱ्यांनाही बागेला भेट दिली आहे.
  • पश्चिम बंगालहून एका व्यापाऱ्यामार्फत रोपे आणून वीस गुंठ्यांत ॲपल बेर फुलवले आहे. 
  •  जानेवारी ते फेब्रुवारी हा फळहंगाम असतो. दरवर्षी १५ ते २० रुपये प्रति किलो दर मिळतो. पूर्वी विक्री नाशिकला व्हायची. आता संगमनेर, अकोले भागातील फळविक्रेते माल खरेदी करतात. त्यामुळे विक्री तुलनेने सोपी झाली आहे. वर्षभरात एकूण एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न या पिकातून मिळते. यंदा सुमारे २५ टक्के थेट विक्री करून त्यास ३० ते ३५ रुपये प्रति किलो दर मिळवला. 
  • संजय सांगतात की माझे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. मात्र अभ्यासातून मी शिकत गेलो व शेती विकसित केली. आमच्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक आहे. या जमिनीत उसाचे पीक घेतले. त्यात पाचट कुट्टीचा वापर केला. चार वर्षे उत्पादन घेतल्यानंतर फळबागेकडे वळलो. 
  • आंबा, चिकू नारळ, पपई, पेरू, अंजीर आदींचीही बांधावर लागवड केली आहे. प्रत्येक झाडापासून सुमारे एकहजार रुपयांचे उत्पन्न वर्षभरात मिळावे असा प्रयत्न असतो. चिचेंचे देखील एक झाड आहे. वर्षभरात ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून देते. 
  • अलीकडील काळात जमिनीचा पोत सुधारण्यावर भर दिला. शेण, गोमूत्र, गूळ, बेसन यांचा वापर करून स्लरी तयार केली जाते. दर महिन्याला ती प्रत्येक पिकाला देण्यात येते. 
  • गांडूळखत व व्हर्मीवॉश तयार केले जाते. कडुनिंब व धोतरा यांचा वापर करून जैविक कीडनाशक तयार केले जाते. 
  • पाण्याचे नियोजन  वाकचौरे हे मूळ पिंपळगाव निपाणी गावचे आहेत. त्यांनी १९९५ मध्ये डोंगरगाव येथे जमीन घेतली.  शेतीला पाण्याची सोय नव्हती.  मग तीन किलोमीटरवर देवठाण वीरगाव शिवारात जागा घेऊन तिथे विहीर खोदली. तिला मुबलक पाणी लागले. पिंपळगाव येथेही दोन विहिरी आहेत. डोंगरगाव येथे व धामोरी फाट्यावरील एक एकर अशा दोन्ही ठिकाणी शेततळे घेतले आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन करून शेतात पाणी आणले आहे. डोंगरगाव येथेशेततळ्यात पाणी आणून त्यातून ग्रॅव्हिटीमार्फत म्हणजे वीज व मनुष्यबळाचा वापर न करता ११ एकरांतील शेतीला सिंचन केले जाते. वाकचौरे यांना पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. संपर्क : संजय वाकचौरे  ९८६०९३२७४४

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT