सातारा जिल्ह्यात हळद हे प्रमुख नगदी पीक आहे. काळानुसार पीक व्यवस्थापनात बदल, यांत्रिक पद्धतीचा वापर व मूल्यवर्धन यातून ही शेती शाश्वत करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी केला आहे. सातारा जिल्ह्याचे ऊस, आले या नगदी पिकांबरोबर हळद हेही प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाई, सातारा, कऱ्हाड, जावळी, कोरेगाव या भागात तर जिल्ह्याचे या पिकाखालील एकूण सरासरी क्षेत्र साडेतीन ते चार हजार हेक्टरपर्यंत आहे. काळाच्या ओघात येथील शेतकऱ्यांनी सुधारित तंत्र, वाण यात बदल करीत हे पीक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हळद पिकातील सुधारणा वाण भुईंज येथील प्रगतिशील हळद उत्पादक व कृषिभूषण राजेंद्र गायकवाड सांगतात, की सेलम हेच वाण या भागात अधिक आहे. त्यात कुरकुमीनचे प्रमाण अन्य काही वाणांच्या तुलनेत कमी असले तरी उत्पादकता अधिक आहे. काही प्रमाणात राजापूरी, प्रतिभा हे आपल्याकडील तर अगदी कमी प्रमाणात बिहार राज्यातील वाणांचा वापर होतो. लागवड तंत्रात बदल अलीकडील काळात लागवड तंत्रात बदल झाला आहे. पूर्वी मजुरांच्या साह्याने लागवड व्हायची. गायकवाड सांगतात, की एकरी किमान तीस माणसे लागायची. बियाणे जेवढे खोल जायला पाहिजे तेवढे ते अनेक वेळा जायचे नाही. पुढे ते उघडे पडायचे. मग त्याला माती लावावी लागायची. त्याला एकरी आठहजार ते १० हजार रुपये खर्च यायचा. अक्षय तृतीया किंवा जूनच्या सुरुवातीस लागवडीसाठी एकाचवेळी मजूर उपलब्ध होत नसत. आता गादीवाफा पद्धत (बेड) वापरात आली आहे. किन्हईचे अशोक चिवटे, भुईंजचे गायकवाड तसेच काही स्थानिक व्यावसायिकांनी लागवड यंत्र तयार केले आहे. उदाहरण द्यायचे तर गायकवाड यांचे यंत्र ट्रॅक्टरचलित आहे. पाच इंच खोलीपर्यंत बियाणे लावता येते. घरातील दोन, चार व्यक्ती असल्या तरी तेवढ्यावर काम होऊन जाते. यंत्राचे झालेले फायदे
अन्य व्यवस्थापन
उत्पादन एकरी सरासरी ७५ हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एकरी सरासरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. गायकवाड यांनी ३५ ते ३८ क्विंटलपर्यंतही उत्पादन घेतले आहे. दरवर्षी पीक असल्याने बियाण्यावरील खर्चातही बचत होते. हळदीचे मूल्यवर्धन जिल्ह्यातील काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने हळद उत्पादनाचा प्रयत्न करताहेत. मात्र हे प्रमाण कमी आहे. जाणकारांच्या मते एकूण लागवडीपैकी दहा टक्के हळद पावडर तयार करून विक्री केली जाते. चांगल्या प्रकारे ‘पॅकिंग’ व ब्रॅंडिग केल्यास ग्राहकांकडून मागणी येत आहे. बाजारपेठ व दर मागील तीन ते चार वर्षांचा विचार केल्यास सरासरी सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल रुपये दर राहिले आहेत. शेतकऱ्यांनी हळद बाजारात आणावी यासाठी व्यापाऱ्यांकडून वेगवेगळे फंडे वापरले जातात. बाजारात हळद कमी येत असल्यास एखाद्या शेतकऱ्यास उच्चांकी दर दिला जातो. यावर्षी वाई बाजार समितीत कमाल २९ हजार रुपये इतका विक्रमी दर नाममात्र शेतकऱ्यांना मिळाला. वाई व सांगली येथील बाजार समितीत सर्वाधिक विक्री होते. पावडरची विक्री पुणे व मुंबई येथे होते. हळदीचे दर घसरतात त्या वेळी शेतकऱ्यांकडून ‘वेअर हाउस’चा वापर केला जातो. शेतकरी प्रतिक्रिया सरकारने हळद निर्यातीस चालना दिली पाहिजे. शेतकऱ्यांचा माल शेतात उत्पादित होत असल्याने त्यावर ‘जीएसटी’ घेतला जाऊ नये. - राजेंद्र गायकवाड, ९९२३९१८०८५ मजुरांद्वारे हळद लागवडीत वेळ, पैशांचा मोठी अपव्यय व्हायचा. त्यावर पर्याय म्हणून लागवड यंत्र सात वर्षांपूर्वी तयार केले आहे. त्याद्वारे लावण, खते देणे आदी कामे एकाच वेळी करणे शक्य झाले आहे. - अशोक चिवटे, ९४२३२६४८८८ कृषिभूषण सेंद्रिय शेतकरी (किन्हई, ता. कोरेगाव) हळदीच्या दरांतील अस्थिरतेमुळे त्यात मिरची, गवारी, भेंडी, पालेभाज्या यांची आंतरपिके घेतो. हळद काढणीनंतर मार्चच्या दरम्यान ऊस घेतो. हे ‘रोटेशन’ अनेक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरले आहे. - अजित ससाणे, ९४५९०११९५२ प्रगतिशील शेतकरी, कवठे, ता. वाई मी सेंद्रिय हळद करत असून, एकूण उत्पादनापैकी ६० टक्के पावडर तयार करून माउली टेड्रर्स या नावाने पॅकिंग करून पुणे येथे विक्री करतो. हळदीस मिळणाऱ्या दराच्या जवळपास दुप्पट दराने पावडरची विक्री होते. - चंद्रसेन बाबर, किकली, ता. वाई ७०८३१९९१८७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.