Unseasonal Rain: बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असतानाच बुधवारी (ता. १) सायंकाळी हवामानाने अचानक कूस बदलली. विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पूर्वमोसमी पावसाने संपूर्ण बीड जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्याच्या विविध भागांत या पावसाने आंबा बागा आणि पालेभाज्यांचे अतोनात नुकसान केले असून, बळिराजा पुन्हा एकदा संकटाच्या गर्तेत सापडला आहे. या वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले असून पालेभाज्याही मातीमोल झाल्या आहेत. .हंगामाच्या सुरवातीलाच आंब्याचा बहर चांगला असल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, बुधवारी दुपारी ५ च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने या आनंदावर विरजण घातले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता, की कैऱ्यांचा सडा झाडांखाली पडला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आंबा बागा भुईसपाट झाल्या असून बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. फळबागाच नव्हे, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचेही या पावसाने नुकसान झाले आहे..Mango Crop Damage : पावसाळी वातावरणामुळे आंब्याच्या विक्रीवर परिणाम.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भाजीपाला पिके कोलमडून पडली, तर सखल भागात पाणी साचल्याने उभ्या पिकात सड होण्याची भीती निर्माण झाली आहे. या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे..उन्हाळ्याच्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याऐवजी या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे..Animal Crop Damage Issues: मोकाट जनावरांचा धसई परिसरात उच्छाद.वर्षभर पोटच्या पोरासारख्या आंबा बागा जोपासल्या होत्या. यंदा बहरही चांगला होता, वाटलं होतं चार पैसे हातात येतील. पण, बुधवारी आलेल्या अर्ध्या तासाच्या वादळाने होत्याचं नव्हतं केलं. झाडाखाली पडलेल्या कैऱ्यांचा सडा पाहून डोळ्यांत पाणी येतंय. आता खर्च तरी निघेल का, याचीच काळजी आहे.- सोपानराव मुंडे, आंबा उत्पादक.उन्हाळ्यात पाण्याची ओढाताण असतानाही पदरमोड करून ठिबकवर पालेभाज्या जगवल्या. पण या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसाने उभं पीक जमिनीला टेकवलं आहे. वाफ्यात पाणी साचल्याने आता भाजी सडून जाईल.- विष्णू कदम, भाजीपाला उत्पादक, बीड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.