Dairy Business Agrowon
यशोगाथा

Dairy Business : दुग्ध व्यवासायातून ‘सोन्ना’च्या अर्थकारणाला गती

परभणी जिल्ह्यातील प्रमुख दुग्ध उत्पादक गाव म्हणून सोन्ना गावाची ओळख निर्माण झाली आहे. प्रतिदिन १८०० लिटरपर्यंत दुधाचा पुरवठा परभणी शहरात करण्याची क्षमता गावाने तयार केली आहे. दररोजचे नगदी उत्पन्न देणाऱ्या या व्यवसायातून शेतकऱ्यांचे अर्थकारण भक्कम झाले आहे.

माणिक रासवे

परभणी शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे दुधाची मागणी (Milk Demand) वाढत आहे. त्यामुळे शहराच्या १० ते २० किलोमीटर परिघातील गावातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाची (Dairy Business) संधी मिळाली आहे. परभणी शहरापासून १० किलोमीटरवर ब्राह्मणगाव-मांडाखळी- पाळोदी- मानवत या रस्त्यावर सोन्ना गाव आहे. मध्यम भारी जमीन व सिंचित (Irrigation) क्षेत्र चांगले आहे.

हंगामी पिके घेतली जातात. गावातील अत्यल्प, अल्पभूधारक, बहूभूधारक अशा सर्व शेतकऱ्यांच्या पिढ्या दुग्ध व्यवसायात आहेत. देशी, संकरित गायी, म्हशी आदी पशुधनाची संख्या अन्य गावांपेक्षा अधिक आहे. सन २०१७ मधील २० व्या पशुगणनेनुसार म्हशी ३०७, रेडे २, गायी १२६, बैल १६१, शेळ्या २३ अशी संख्या आहे. पाच वर्षात म्हशींची संख्या ३२५ ते ३५० पर्यंत पोहोचली आहे.

दृष्टिक्षेपात सोन्ना

लोकसंख्या- २००७

भौगोलिक क्षेत्र - ११२५.७७ हेक्टर, पेरणी योग्य क्षेत्र -१०९३ हेक्टर

एकूण शेतकरी संख्या - ८१५, अत्यल्प,अल्पभूधारक- ६०१

दुग्ध व्यवसायातील कुटुंबे -११०

दुग्धोत्पादनात वाढ

सन १९८० ते १९९० या काळात गावात स्थानिक म्हशी होत्या. त्या वेळी दुग्धोत्पादकांची संख्या १० ते २० होती. अलीकडील वर्षांत पीक उत्पादन व दरांची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे ही जोखीम व भार कमी करण्यासाठी शेतकरी अधिक दूध देणाऱ्या मुऱ्हा, जाफराबादी आदी म्हशींच्या पालनाकडे वळले. त्यातून गावातील दुग्धोत्पादनात वाढ झाली.

जनावरे व गोठा व्यवस्थापन

-चारा बचतीसाठी अर्ध बंदिस्त गोठा पद्धतीवर शेतकऱ्यांचा कल.

-बहुतांश शेतकऱ्यांकडून रस्त्याच्या काठांवरील शेतांमध्ये गोठे बांधणी.

-सिमेंटची गच्ची, गव्हाणी बांधलेल्या दिसतात. त्यामुळे गोठ्याची स्वच्छता सोपी होते.

-तापमान योग्य राखण्यासाठी छताला पंखे.

-गोठ्याजवळ सिमेंटचे हौद बांधून पाण्याची व्यवस्था.

-काशिनाथ दंडवते यांनी सिमेंटच्या छताचा प्रशस्त गोठा उभारला.

-ज्वारी, मका यासोबत बरसीम, यशवंत गवत आदींसाठी क्षेत्र राखीव.

-दूधवाढीसाठी व्याल्यानंतर काही दिवस म्हशीला गुळयुक्त आहार. ज्वारीचा कडबा, सोयाबीन, पिकांचा भुस्सा (गुळी) यांचा वापर. विविध रोगांसाठी वेळेवर लसीकरण. पशुवैद्यकांकडून तपासण्या. निरोगी पशुधनामुळे दुग्ध उत्पादनात खंड पडत नाही.

अर्थकारणाला बळकटी

गावातून प्रतिदिन १५०० ते १८०० लिटर दूध पुरवठा परभणी शहरात नागरी वसाहती (रतीब), हॉटेल्स, खासगी डेअरी, मिठाई भांडार आदींना केला जातो. रतीबाच्या दुधाचे दर प्रतिलिटर ६० ते ७० रुपये तर हेच दर खासगी डेअरीसाठी ५० ते ५५ रुपये आहेत. घरटी प्रत्येकाकडे शेणखत उपलब्ध होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता व पीक उत्पादकता वाढण्यास मदत झाली. रासायनिक खतांचा वापर कमी होऊन खर्चात बचत झाली.

अनेक शेतकरी घरची गरज भागल्यानंतर शेणखताची विक्री करतात. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. याच व्यवसायाधारे शेतकऱ्यांचे कौटुंबिक व शेती अर्थकारण बळकट झाले. काहींनी पक्की घरे, गोठे बांधले. जमिनी खरेदी केल्या. म्हशींच्या संख्येत वाढ करून दुग्धोत्पादन वाढविले. बहुतांश शेतकरी मोटर सायकलवरुन दूध विक्रीसाठी नेतात. काही शेतकरी स्वतः सोबत अन्य शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करून परभणीत पुरवठा करतात. त्यद्वारेही त्यांना दररोज अतिरिक्त उत्पन्न मिळते.

अवजारे बँक व फळबागा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत तत्कालीन व विद्यमान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनुक्रमे संतोष आळसे, व्ही. डी. लोखंडे, तत्कालीन व विद्यमान तालुका कृषी अधिकारी अनुक्रमे प्रभाकर बनसावडे व नित्यानंद काळे, कृषी सहायक कृष्णा पाटील यांचे मार्गदर्शन. त्यातून यांत्रिकीकरणास चालना.

-‘आत्मा’ अंतर्गत जय मल्हार शेतकरी गटाची अवजार बँक. त्यात २६ आणि ५० एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर, नांगर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, पऱ्हाटी कुट्टी व मळणी यंत्र, सोयाबीनसाठी रिपर आदींचा समावेश. मागणीनुसार भाडेतत्त्वावर अवजारे देण्याची सोय ‘पोकरा’तून संत्रा, पेरू, सीताफळ आदींच्या लागवडीला चालना.

आमचे ३४ एकर क्षेत्र आहे. सन १९८५ मध्ये दुग्ध व्यवसाय सुरू केला. सहा म्हशी होत्या. दररोज दहा ते वीस लिटर दूध सायकलवरून नेऊन परभणीत विक्री करायचो. आता मुले हाताशी आली आहेत. सध्या मुऱ्हा, जाफराबादी अशा आठ म्हशी आहेत. दररोज ५० ते ६० लिटर दूध उपलब्ध होते. अर्थकारण सुधारले आहे.
रावसाहेब गमे, ९७६७०४५६७४
४० एकर जमीन आहे. १० देशी गायींसह ३५ जनावरे आहेत. शेतीकामांसाठीही घरचे बैल मिळतात. दरवर्षी ५ ते ६ गोऱ्हे, कालवडींच्या विक्रीतून दीड ते दोन लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळते.
राम गमे ९६३७२३५९५८
दहा वर्षांपासून दुग्ध व्यवसायात आहे. १७ म्हशी आहेत. गीर गाय आहे. दररोज प्रति दिन १४० लिटर दूध उपलब्ध होते. ६० लिटरचे रतीब आहे. उर्वरित दूध डेअरीला देतो. दीड ते दोन एकरांत चारापिके घेतो.
शिवाजी दंडवते, ९५११८२८०११
जमीन कमी असल्याने पूर्वी वडील मजुरी करीत. आता दुग्ध व्यवसायातून प्रगती झाली आहे. दररोज ३० ते ४० लिटर दूध संकलन व अन्य शेतकऱ्यांकडून ३० ते ३५ लिटर दूध खरेदी करतो.
दत्ता गमे ८९९९६४९९८५
दोघा भावांची दुसरी पिढी दुग्ध व्यवसायात आहे. दररोज अडीचशे लिटर दुधाची विक्री करतो. आर्थिक स्थैर्य लाभले आहे.
संदीप कदम ९३७०७०५५३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT