Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यातील १७ जिल्ह्यात येलो अलर्ट; विदर्भात पावसाचा जोर वाढणार 

Weather Update : राज्यात प्रामुख्याने उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यात काही ठिकाणी सकाळपासून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित जिल्ह्यात पाऊस उघडीप देण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तर धुळे, नंदूरबार, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरीचा अंदाज आहे.

तर पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्यासह विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारे आणि वीजांसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. 

मागील दोन आठवड्यापासून राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली होती. आता पुढील पाच दिवस विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ वाशिम, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येलो अलर्ट हवामानशास्र विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात प्रामुख्याने उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT