Maharashtra Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज; सात जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट

Rain Update : हवामान विभागाने आजही सात जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला.

Anil Jadhao 

Rain Alert : राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाने हजेरी लावली. पण पावसाचा जोर कमीच होता. हवामान विभागाने आजही सात जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला.

हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला. आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये विज आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तर ठाणे, नगर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांसह काही भागात हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्याही सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावासाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर रायगड आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT