Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट; राज्याच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होण्याची शक्यता

Rain Update : काल माॅन्सूनने राज्यात प्रवेश केल्यानंतर आज त्याच जागेवर मुक्काम केला. आज माॅन्सूनने प्रगती केली नाही.

Anil Jadhao 

Pune News : काल माॅन्सूनने राज्यात प्रवेश केल्यानंतर आज त्याच जागेवर मुक्काम केला. आज माॅन्सूनने प्रगती केली नाही. पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. तर पुढील ४ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सूनने काल राज्यातील सिंधुदूर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा व्यापला होता. तसेच रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात माॅन्सून दाखल झाला. तसेच कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात माॅन्सूनने प्रगती केली. अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागरात बहुतांशी भागात माॅन्सून पोचला. माॅन्सूनची सिमा आजही रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयानगरम भागात होती. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये माॅन्सून महाराष्ट्राचा आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापेल असाही अंदाज आहे. तसेच तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग माॅन्सून व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागात पुढील ४ चार दिवस पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. आज बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT