monsoon back Agrowon
हवामान

Monsoon Return : कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा 'येलो अलर्ट'; हवामान विभागाने दिला इशारा

Monsoon Rain Return : हवामान विभागाने काल राज्यातील संपूर्ण मराठवाडयासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला होता.

Dhananjay Sanap

Monsoon Back : राज्यातील काही जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने काल राज्यातील संपूर्ण मराठवाडयासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला होता. 

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान पुढील २ ते ३ दिवसात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज कोकणातील सर्व जिल्हयासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

आज मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपुर, गडचिरोली, अमरावती जिल्हयासह मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे, कोल्हापुर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजां आणि ढगांच्या गडगडाटा सह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोंकणातील पालघर, ठाने, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवसांनंतर मात्र राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मॉन्सून परती सीमा आजही राजस्थानमधील नौखरा, जोधपूर, बारमेर याच भागात आहे. परंतु पुढील २ ते ३ दिवसात मॉन्सून राजस्थानच्या आणखी काही भागातून माघार घेण्यास पोषक स्थिति असल्याचं हवामान विभागाने म्हंटलं आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत कोकणात तर  २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT