Rain Update  Agrowon
हवामान

Monsoon Rain : गुरुवारपासून पाऊस पुन्हा वाढणार ? राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप कायम

Weather Update : हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची उघडीप आहे. तर राज्यातील काही ठिकाणी अधून मधून जोरदार सरीही पडत आहेत. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. 

माॅन्सूनचा ट्रफ सध्या सक्रीय असून आपल्या सर्वसाधारण जागेच्या दक्षिणेकडे झुकलेला आहे. हा ट्रफ पुढील ४ ते ५ दिवसात उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण गुजरात ते केरळ दरम्यान किनारपट्टीला समांतर कमी दाबावाचा पट्टा आहे. झारखंड आणि शेजारच्या भागात तसेच अरबी समुद्र आणि सौराष्ट्राच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. 

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सर्व जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. नगर, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

उद्या राज्यातील काही भाग वगळले तर पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. तर गुरुवारपासून पुन्हा कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT