Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Rain : कोणत्या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार ? राज्यात पुढील ४ दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

Rain Update : पुढील चार दिवस राज्यातील काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्याच्या अनेक भागात कमी आधिक प्रमाणात कालपासून पाऊस हजेरी लावत आहे. तर काही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस झाला. तर पुढील चार दिवस राज्यातील काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर कोकणातील रायगड आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. 

सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर, जाला, परभणी तसेच नाशिक, जळगाव आणि नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तसेच सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात मात्र अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. तसेच कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून सिंधुदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यात जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

गुरुवारी आणि शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रीतील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस राहू शकतो. तसेच पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT