Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

Weather Forecast : दोन दिवस राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात उष्णचा चटका चंगलाच वाढला. तर काही ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसही राज्यातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. 

हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर उद्या ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे.

तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर जिल्ह्यात उष्ण रात्रीचा अंदाज आहे. तसेच मराठवड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर काही ठिकाणी उष्ण रात्रीचा अंदाज आहे. 

तसेच विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला.

तर राज्याच्या बहुतांशी भागात उन्हाचा चटका कायम राहू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तर उद्यापासून राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT