back to Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Back : राज्यात आज पावसाची स्थिती काय? माॅन्सूनचा परतीचा प्रवास आज कुठवर पोचला?

Monsoon Return : हवामान विभागाने आज राज्यात कही ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल, असा अंदाज दिला.

Anil Jadhao 

IMD Alert : माॅन्सूनचा परतीचा प्रवास आज थांबला होता. राज्याच्या बहुतांशी भागातून माॅन्सून केव्हाच परतला. पण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या भागात माॅन्सूनचे अस्तित्व आजही आहे. हवामान विभागाने आज राज्यात कही ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल, असा अंदाज दिला.


वाशीम, बुलडाणा, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमधील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. आज मात्र बहुतांशी भागात उन्हाचा चटका होता. हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. काही भागात ढगाळ वातावणर राहू शकते. तर पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होऊ शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

माॅन्सूनचा परतीचा प्रवास आज रखडला होता. माॅन्सून कालच्या जागेवर होता. काल माॅन्सूनने देशातील काही भागातून माघार घेतली. बिहारचा उर्वरित भाग, हिमालयाच्या बाजुचा पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, संपूर्ण ईशान्य भारतातून माॅन्सून परतला होता. तर उत्तर बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग, मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि तेलंगणाच्या उर्वरित भागातून आज माॅन्सूनने माघार घेतली होती. माॅन्सूनची सिमा आज मच्छलीपट्टनम, कर्नूल, बदामी, आणि वेंगुर्ला भागात कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT