Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: उद्या ६ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज काय ?

Rain Update : राज्यातील अनेक भागात सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे. तर काही भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही.

अनिल जाधव

Pune News : राज्यातील अनेक भागात सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे. तर काही भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भातील उर्वरित जिल्हे आणि महाराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्र आणि मराठड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

उद्या हवामान विभागाने राज्यातील ६ जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. सिंधुदूर्ग, सातारा, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. तर कोकणातील सिंधुदूर्ग, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई तसेच पुणे, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला.

तसेच विदर्भातील उरलेले चार जिल्हे मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली तसेच नगर आणि कोल्हापूर जिल्हाला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे.

शनिवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. बुलडाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्याला येलो अलर्ट तर उरलेल्या ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच कोकणात सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर उरलेल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला.

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड तसेच जळगाव जिल्ह्यालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

रविवारी आणि सोमवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार तर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Paddy Procurement: चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट मर्यादित

Pomegranate Orchard Damage: वादळी वाऱ्यासह गारपीट; डाळिंब बागांचे नुकसान

Declining Water Storage: लघु प्रकल्पात १८ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १९ टक्के पाणीसाठा

Tractor Cultivation Charges Hike: शेती मशागतीचे दर २०० रुपयांनी वाढले

Drip Irrigation Project: ढिवरवाडी सिट्रस इस्टेटमध्ये अखेर लागणार ड्रीप

SCROLL FOR NEXT