Rain Forecast Agrowon
हवामान

Rain Forecast : राज्यात पुन्हा वादळी पावसाचा इशारा कायम

राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली आहे. कमाल तापमानात काहीशी घट होऊन उकाड्यात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Pune Weather Update : राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस (Stormy Rain), गारपिटीने (Hailstorm) हजेरी लावली आहे. कमाल तापमानात काहीशी घट होऊन उकाड्यात वाढ झाली आहे.

आज (ता.९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain Forecast) इशारा हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानात घट होणार असली तरी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

ढगाळ हवामान, पावसाची हजेरी यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर जळगाव आणि धुळे येथे तापमान ३९ अंशावर पोचले होते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा वाढून १६ ते २५ अंशांच्या दरम्यान होते.

दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती, मध्य महाराष्ट्र ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे.

शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.० (२१.१), जळगाव ३९.० (२१.२), धुळे ३९.० (१७.६), कोल्हापूर ३८.१ (२२.३), महाबळेश्वर २९.० (१६.८), नाशिक ३५.८ (२०.६),

निफाड ३६.६(१८.५), सांगली ३३.७ (२१.५), सातारा ३५.४ (२०.५), सोलापूर ३१.६ (२१.५), सांताक्रूझ ३५.५ (२०.०), डहाणू ३२.८ (२५.५), रत्नागिरी ३४.४ (२४.४),

छत्रपती संभाजीनगर ३५.८ (१८.८), नांदेड ३३.२ (२२.४), परभणी ३७.८ (२२.२), अकोला ३७.३ (१८.६), अमरावती ३७.०(१७.१), बुलडाणा ३५.४ (१९.०), ब्रह्मपुरी ३९.२ (२२.२),

चंद्रपूर ३४.० (२२.४), गडचिरोली ३४.४(१७.४), गोंदिया ३८.४ (२०.४), नागपूर ३७.० (१९.६), वर्धा ३८.०(१९.८), वाशीम ३६.२ (१९.८), यवतमाळ ३७.२ (१९.२).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Recruitment Case: बोगस भरती प्रकरणी आत्मा प्रकल्प संचालकाला अटक

Pune APMC National Status: पुणे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा द्या; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Fake Agricultural Fertilizers: बोगस निविष्ठा प्रकरणात ‘कृषिउद्योग’ चर्चेत; आमदार परिणय फुके यांच्या तक्रारीनंतर कारवाई

Water Crisis: पुणे जिल्हा अजूनही पाण्यासाठी तहानलेला

Iran Talks: चर्चेची पहिली फेरी पूर्ण; ट्रम्प यांच्या विधानानंतर इराणचे शिष्टमंडळ तेहरानला रवाना

SCROLL FOR NEXT