Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : वादळी पावसाचा इशारा कायम

Rain News : राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहे. यातच सकाळपासूनच उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहे. यातच सकाळपासूनच उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे. आज (ता. १७) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम आहे. तर उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने म्हटले आहे.

गुरूवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंशांच्या वर आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहे.

अरबी समद्रात येमेनच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. राज्यातही पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. १७) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

गुरूवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.५, धुळे ४१.०, जळगाव ४२.० कोल्हापूर ३५.७, महाबळेश्वर २९.६, मालेगाव ४०.०, नाशिक ३८.३, निफाड ३६.७, सांगली ३६.६, सातारा ३६.७, सोलापूर ३६.०, सांताक्रूझ ३७.२, डहाणू ३७.५, रत्नागिरी ३६.०,

छत्रपती संभाजीनगर ३८.०, बीड ३७.३, नांदेड ३७.२, धाराशिव ३७.८, परभणी ३५.५, अकोला ४०.९, अमरावती ३८.४, बुलढाणा ३७.६, ब्रह्मपूरी ३९.४, चंद्रपूर ४०.८, गडचिरोली ३९.२, गोंदिया ३८.१, नागपूर ३६.२, वर्धा ३८.२, वाशीम ४१.२, यवतमाळ ३८.५.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सिंधुदुर्ग, नगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT