Himachal Heavy Rain Agrowon
हवामान

Himachal Rain : हिमाचल प्रदेशात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Team Agrowon

Weather Update : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्याने व अचानक आलेल्या पुरामुळे गेल्या २४ तासांपासून बंद असलेला चंडीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग अखेर मंगळवारी (ता. २७) वाहतुकीसाठी खुला झाला.

रविवारी (ता. २५) संध्याकाळपासून हा महामार्ग बंद असल्याने मंडी जिल्ह्यात पर्यटकांसह शेकडो जण अडकून पडले होते. राज्य आपत्कालीन मदत केंद्राच्या माहितीनुसार पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू असून बुधवारी (ता. २८) आणि गुरुवारी (ता. २९) हवामान खात्याने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

त्याचप्रमाणे शुक्रवारी (ता. ३०) आणि शनिवारी (ता. १) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिलासपूरमधील बर्टिनमध्ये ६६ मि.मी, माशोब्रात ४६ मि.मी. तर गोहरमध्ये २८ मि.मी. आणि सिमल्यात २३ मि.मी. पावसाची नोंद झाली.

दरम्यान, मंडी शहरापासून ४० किमी अंतरावरील खोटिनल्लाह येथे अचानक आलेल्या पुरामुळे महामार्गाचा मंडी ते कुलू हा ७० किमीचा टप्पा बंद करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, सहा मैल परिसरात दरड कोसळल्याने मंडी ते पांडोह हा टप्पाही बंद केला होता.

मात्र, प्रशासनाने दरडीचा ढिगारा काढून स्ता मोकळा केला. त्यानंतर, तब्बल २४ तासांनी हा महामार्ग पुन्हा सुरू झाला. दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव ओंकारचंद शर्मा(महसूल) यांनी पर्यटकांना नदी तसेच जलाशयांत न जाण्याचा सल्ला दिला असून हवामान खात्याने ॲप डाउनलोड करण्याचीही सूचना केली आहे.

पावसाचा फटका

बंद रस्ते

११६

विस्कळीत पाणीपुरवठा योजना

७०

ट्रान्सफॉर्मरचे नुकसान

१०६

एकूण नुकसान

१०२ कोटी रु.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT