Maharashtra Weather Agrowon
हवामान

Vidarbha Weather: पावसाअभावी विदर्भाची होरपळ

Maharashtra Monsoon Update: पावसाअभावी कमाल तापमान चाळिशीपार गेल्याने विदर्भात होरपळ वाढली आहे. आज (ता. १२) दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: पावसाअभावी कमाल तापमान चाळिशीपार गेल्याने विदर्भात होरपळ वाढली आहे. आज (ता. १२) दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

कमाल तापमान वाढल्याने विदर्भात पारा चाळिशीपार गेला आहे. बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील नागपूर आणि ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. ‎‎अमरावती, ‎भंडारा, ‎‎‎अकोला, ‎वर्धा येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तर ‎यवतमाळ, ‎गोंदिया, जळगाव येथे पारा चाळिशीपार होता.

आज (ता. १२) मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर मराठवाड्यातील धाराशीव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याने, तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

शनिवारपासून मॉन्सूनची प्रगती शक्य

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) यंदा वेगाने प्रगती करत २६ मे पर्यंत महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागात प्रगती केली. त्यांनतर गेल्या दोन आठवड्यांपासून मॉन्सूनची वाटचालीची सीमा ‘जैसे थे’ आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून (ता. १४) मध्य भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३१.५---२३.९

अहिल्यानगर---निरंक---२३.७

‎‎धुळे---३९.०---२३.६

जळगाव---४०.४---२७.२

जेऊर---३१.०---२१.५

‎‎कोल्हापूर---३१.४---२१.२

महाबळेश्वर---२३.१---१७.१

मालेगाव---३८.२---२४.६

‎‎नाशिक---३१.३---२३.२

‎निफाड---३४.०---२३.६

‎सांगली---३२.८---२३.९

‎सातारा---३२.४---२२.१

‎सोलापूर---२९.०---२४.२

‎सांताक्रूझ---३३.७---२८.८

डहाणू---३४.०---२८.०

‎रत्नागिरी---३२.४---२७.३

‎छत्रपती संभाजीनगर---३६.८---२५.०

‎धाराशिव---३०.९---२०.७

‎परभणी---३२.४---२३.५

परभणी (कृषी)---२९.६---२१.१

‎‎अकोला---४२.०---२९.७

अमरावती---४२.४---२५.८

‎भंडारा---४२.४---२५.७‎‎

बुलडाणा---३६.६---२६.६

‎ब्रह्मपुरी---४३.६---२२.८

‎चंद्रपूर---३७.८---२२.४

‎गडचिरोली---३७.०---२३.६

‎गोंदिया---४०.८---२४.४

‎नागपूर---४३.६---२४.४

‎वर्धा---४२.०---२४.५

‎वाशीम---३८.०---२५.६

‎यवतमाळ---४१.४---२४.०

जोरदार वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : कोल्हापूर, सांगली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

जोरदार वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलडाणा, वर्धा, वाशीम, भंडारा, यवतमाळ.

४० अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : ‎ब्रह्मपुरी ४३.६, ‎नागपूर ४३.६, अमरावती ४२.४, ‎भंडारा ४२.४, ‎‎‎अकोला ४२, ‎वर्धा ४२, ‎यवतमाळ ४१.४, ‎गोंदिया ४०.८, जळगाव ४०.४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Price Increase: ‘एल निनो’, रुपया घसरण पथ्यावर पडणार

Silage Machine Distribution: पशुपालकांना होणार मुरघास संयंत्रांचे वाटप

Farmer Children Support: आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी पहिले मुक्त विद्यालय सुरू

Kolhapur Jaggery Market: कोल्हापूर बाजार समितीत उसाअभावी गूळ आवक घटली

Heat Wave Alert: विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

SCROLL FOR NEXT